पंकजांवर टीका होताच माधुरी मिसाळ चिडल्या...संजय काकडेंना सुनावले

संजय काकडे हे फुटकळ प्रसिद्धीसाठी पंकजा मुंडेंवर टीका करत असल्याचा माधुरी मिसाळ यांचा टोला
madhuri misal targrts sanjay kakade
madhuri misal targrts sanjay kakade

पुणे ः भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवरून पुणे शहर भाजपमध्येच सामना रंगला आहे. मुंडे यांनी पक्षावर टीका केल्याचा आरोप करत  खासदार संजय काकडे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. पुणे भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी खासदार काकडे यांना त्यावर खडेबोल सुनावले. "आमच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही,' असा टोला लगावत मिसाळ यांना काकडे यांना फटकारले.


गुरूवारी परळी येथे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मानातील खदखद व्यक्त करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यावर आज संजय काकडे हे फडणवीस यांच्या समर्थनार्थ उतरले. "पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्य भाजपच्या कार्यकर्त्यांना दुखावणारे आहे. आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडणे योग्य नाही. पाच वर्ष पंकजा मुंडे यांच्याकडे महत्वाची खाती होती, पण साधा मतदारसंघ सांभाळता आला नाही. व्यवस्थित काम केले असते तर तर विधानसभेला 1 लाख मतांनी निवडून आल्या असते, असे त्यांनी सांगितले.

आता दौरे काढून काय दिवे लावणार? पंकजा यांनी मराठा, मुस्लिम, दलित यांच्याकडे दुर्लक्ष केले. गोपीनाथ मुंडे यांची जनतेशी नाळ जोडली गेलेली होती, पण पंकजा मुंडे यांनी कोणालाही जवळ केले नाही. आता जातियवादाचे राजकारण करून काही तरी मिळावे यासाठी पक्षाला ब्लॅकमेल करत आहेत,'' अशी टिकेची झोड उठवली.

काकडे यांची पत्रकार परिषद होताच मुंडे यांच्या निकटवर्तीय असलेल्या माधुरी मिसाळ यांनीही पत्रकार परिषद घेऊन काकडे यांच्यावर टीका केली. "गेल्या दोन तीन दिवसांपासून बाहेरच्या शक्ती भाजपमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत. काकडे यांनी जे विधान केले ते त्यांचे वैयक्तीक विधान आहे. त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही. बाहेरच्या माणसाने भाजपच्या अंतर्गत बाबींवर बोलू नये. फडणवीस व मुंडे यांनी पाच वर्षे एकत्र काम केले आहे, त्यामुळे पक्षात फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्यात गैर काय आहे? मी स्वत: सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करते.''असे मिसाळ सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com