मधुर भांडारकरचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून पाठलाग!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकरचा पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी दिवसभर पाठलाग करुन त्याला नियोजित कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले.आक्रमक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मधुरची कोंडी केली होती, मात्र पोलिसांनी कौशल्याने विषय हाताळत मार्ग काढला.
मधुर भांडारकरचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून पाठलाग! 
मधुर भांडारकरचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून पाठलाग! 

पुणे: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकरचा पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी दिवसभर पाठलाग करुन त्याला नियोजित कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले.आक्रमक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मधुरची कोंडी केली होती, मात्र पोलिसांनी कौशल्याने विषय हाताळत मार्ग काढला. 

मधुर दिग्दर्शित "इंदू सरकार' या चित्रपटावरुन सद्या वादंग सुरु आहे. हा चित्रपट दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित असून त्यात इंदिरा गांधींचे चुकीचे चित्रण केल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. कॉंग्रेसने याप्रश्‍नी भांडारकरचा विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषद एनआयबीएम रस्त्यावरील बीटोज बार एंड किचन या होटेलमधे दुपारी दीड वाजता ठरली होती. मात्र कॉंग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करु शकतात हे ध्यानात आल्यानंतर ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. त्यानंतर भांडारकर बावधनमधील सुर्यदत्ता ईनस्टीट्युटमधील पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र त्या ठिकाणीही कॉंग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार असल्याने भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला आणि ते पुणे स्टेशनजवलील "क्राउन प्लाझा' या ठिकाणी पोहचले. या होटेलमधे तीन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे कळवण्यात आले होते. मात्र त्याआधीच माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस कार्यकर्ते क्राउन प्लाझा हॉटेलमधे घुसले. त्यामुले इथली पत्रकार परिषद ही रद्द करण्यात आली. याठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिस बंदोबस्त मोठा असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना आवरले. पोलिसांनी कौशल्याची परिस्थिती हातळली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com