madhur bhandarkar, police protection | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मधुर भांडारकर यांना पोलीस संरक्षण 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 17 जुलै 2017

मुंबई : इंदू सरकार या चित्रपटाचे निर्माते मधुर भांडारकर यांना राज्य सरकारने पोलिस संरक्षण दिले आहे. इंदू चित्रपटाला कॉंग्रेसचा विरोध असून भांडारकर जेथे जातील तेथे त्यांच्याविरोधात कॉंग्रेस कार्यकर्ते निदर्शने करीत आहेत. 

मुंबई : इंदू सरकार या चित्रपटाचे निर्माते मधुर भांडारकर यांना राज्य सरकारने पोलिस संरक्षण दिले आहे. इंदू चित्रपटाला कॉंग्रेसचा विरोध असून भांडारकर जेथे जातील तेथे त्यांच्याविरोधात कॉंग्रेस कार्यकर्ते निदर्शने करीत आहेत. 

या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडारकर यांना पोलीस सुरक्षा देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली. 
आणीबाणीच्या काळातील काही चुकीच्या घटना इंदू सरकारमध्ये दाखविण्यात आल्या आहेत असा कॉंग्रेसचा आक्षेप आहे. पुण्यापाठोपाठ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल नागपुरातही नारेबाजी करत पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याच प्रमाणे देशभरात कॉंग्रेस आणि इतर काही संघटनांनीही भांडारकर यांच्या या चित्रपटाविरोधात भूमिका घेतली आहे. 

आज मुंबईसह नागपूर आदी ठिकाणीही भांडारकर यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आज भांडारकर यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख