छगन भुजबळ - मधुकर पिचड यांची झाली भेट : दोन्ही दिग्गजांना अश्रू अनावर

अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मैत्री सर्वश्रूत आहे. भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल पिचड यांनी मुंबईत जावून त्यांची भेट घेतली. एेकेकाळी राष्ट्रवादीचे दिग्गज असलेले हे दोन नेते एकमेकांना भेटल्यावर दोघांनाही अश्रू अनावर झाले.
छगन भुजबळ - मधुकर पिचड यांची झाली भेट : दोन्ही दिग्गजांना अश्रू अनावर

नगर : अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मैत्री सर्वश्रूत आहे. भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल पिचड यांनी मुंबईत जावून त्यांची भेट घेतली. एेकेकाळी राष्ट्रवादीचे दिग्गज असलेले हे दोन नेते एकमेकांना भेटल्यावर दोघांनाही अश्रू अनावर झाले.

भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी अटक होऊन दोन वर्षे झाली. शुक्रवारी (ता. ४) त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल पिचड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी भुजबळ यांची रुग्णालयात भेट घेतली.

जुन्या आठवणींना उजाळा
पिचड व भुजबळ यांनी बराच वेळ गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार हेच देशाला तारू शकतात. त्यांचीही तब्येत बरी नाही, पण त्यांनी खूप धावपळ करून चालणार नाही. त्यांना म्हणावं थोडा आराम करा, असा निरोपही भुजबळ यांनी पिचड यांना दिला. भुजबळ यांनी आपल्याला तुरुंगात प्रशासनाने दिलेला त्रास कथन केला. आजारी असतानाही प्रशासनाकडून झालेल्या त्रासाची व्यथा मंडताना त्यांना अश्रू अनावर झाले.

सरकारनामा ब्युरो

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com