राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला भाजपची वाट दाखवली- मधुकर पिचड

वैभव पिचड, चित्रा वाघ, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर, शिवेंद्रराजे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकातं पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्ह्यातील नेते मधुकर पिचड हे देखिल यावे
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला भाजपची वाट दाखवली- मधुकर पिचड

मुंबई : चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजपची वाट दाखवली, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड यांनी नगर जिल्ह्यातल्या राजकारणावर भाष्य केले. पिचड यांनी यावेळी भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. 

वैभव पिचड, चित्रा वाघ, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर, शिवेंद्रराजे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकातं पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्ह्यातील नेते मधुकर पिचड हे देखिल यावेळी उपस्थित होते. पिचड यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.  

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "भाजप परिवरकरता ही आनंदाची बाब आहे. आपल्या कार्याने कर्तृत्वाने आपला दबदबा निर्माण केला  अश्या नेत्यांची मांदियाळी ज्यात अनेक ज्येष्ठ मंडळी आहे त. पिचड यांचा प्रवेश हा अत्यंत महत्वाचा प्रवेश आहे . मधुकर पिचड यांची विषय हाताळायची पद्धत सभागृहात पाहिली आहे. त्यांना प्रश्नांची उत्तम जाण आहे.''

मधुकर पिचड म्हणाले, "मला 79 वर्ष सुरू झाली. मला काही मागायचे नाही. जनतेने मला खूप दिले. पण एकच इच्छा आहे महाराष्ट्र्र सुखी व्हावा. सर्व कार्यकर्त्यानी आग्रह केला देश ज्यांच्या बरोबर जातो त्यांच्या सोबत जायला हवे. त्यामुळे हा निर्णय घेतला. मराठा आरक्षण तोही कायद्याने टिकाव हा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. आम्ही आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या समवेत आलेलो आहोत. ही सर्व तरुण मंडळी आपल्यासोबत आली, त्या विचारांना घेऊन तुम्ही काम करावं. या नवीन तरुणांकडून आपण उत्तमकाम करून घ्यावे. नरेंद्र भाई आणि तुमच्या कडून निश्चितपणे दैदिप्यमान देश घडेल. आम्हाला तुम्ही बरोबरीने वागवावे, सगळे मिळून महाराष्ट्र्र उत्तमपणे घडवूया''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com