यवतमाळ जिल्हा बॅंकेची उमेदवारी 'मेरीट'वर; आमदार येरावार 'एन्ट्री' च्या तयारीत

तब्बल 12 वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा मध्यवती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक यंदा 'हायप्रोफाईल' होण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची आघाडी असा सामना होण्याची स्थिती होती. मात्र, दोन्ही कडून उमेदवारी मिळाली नाही, तर तिसरी आघाडी निवडणूक रिंगणात असणार आहे
Madan yerawar Trying to Enter Yavatmal District Bank
Madan yerawar Trying to Enter Yavatmal District Bank

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची उमेदवारीसाठी यंदा निवडून येण्याचे 'मेरीट' अशी महत्वाची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अनेकांचा पत्ता कट होण्याची भीती आहे. दुसरीकडे भाजपने आघाडी करून लढण्याचे संकेत दिले असून, यवतमाळ तालुका गटातून आमदार मदन येरावार जिल्हा बॅंकेत 'एन्ट्री' करण्याच्या तयारीत आहेत.

तब्बल 12 वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा मध्यवती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक यंदा 'हायप्रोफाईल' होण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची आघाडी असा सामना होण्याची स्थिती होती. मात्र, दोन्ही कडून उमेदवारी मिळाली नाही, तर तिसरी आघाडी निवडणूक रिंगणात असणार आहे. जिल्हा गटांच्या दोन जागा तसेच महिला, ओबीसी या राखीव प्रवर्गातही तिसऱ्या आघाडीचे उमेदवार रिंगणात असणार आहेत. 

निवडणूक लढण्यासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक नुकतीच विश्रामभवन येथे झाली. त्यात तालुका गटाच्या जागांवर चर्चा झाली असली तरी अजूनही अनेक जागांवर 'डिसप्युट' निर्माण झाला आहे. यवतमाळ तालुक्‍यातील जागेचा समावेश आहे. भाजप व तिसऱ्या आघाडीचे आव्हान राहणार असल्याने यावेळी निवडणूक येणे हा मेरीट पाहूनच उमेदवारी महाविकास आघाडीकडून दिली जाणार आहे. 

भाजपही शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात तगडे आव्हान  उभे करण्याच्या तयारीत आहे. यवतमाळ तालुका गटातून आमदार मदन येरावार सहकारातील निवडणुकीच्या आखाड्यात  उतरणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात पॅनल राहणार असल्याने जिल्हा बॅंक निवडणुकीत फाटाफुट होण्याची शक्‍यता आहे.  महाविकास आघाडीतील काही 'अदृश्‍य' हात सोबत असल्याचा दावा आतापासूनच भाजपकडून सुरू आहे. या शिवाय,  जिल्हा गट, राखीव जागांवर तिसऱ्या आघाडीचे उमेदवार राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या  निवडणुकीतही यावेळी रंगतदार सामने होण्याची शक्‍यता आहे.

दिग्गजांचे नाव निश्‍चित

सहकार क्षेत्रात जम बसवून असलेल्या नेत्यांचे नाव महाविकास आघाडीच्या बैठकीत जवळपास निश्‍चित झाले आहेत. उर्वरित नावांवर निर्णय घेण्यासाठी व वाद असलेल्या जागांवर चर्चा करण्यासाठी येत्या 27 किंवा 28 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यामुळे यात कुणाला लॉटरी लागणार किंवा कुणाचा पत्ता कट होणार, यावर शिक्कामोर्तब
होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com