आजचा वाढदिवस : मदन येरावार, राज्यमंत्री भाजप (यवतमाळ)  - madan yeravar bjp | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : मदन येरावार, राज्यमंत्री भाजप (यवतमाळ) 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

 

 

यवतमाळ नगरपरिषदेचे नगरसेवक ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असा प्रवास करणारे मदन येरावार यांचा यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव आहे. यवतमाळ नगरपरिषदेमध्ये निवडून आल्यानंतर त्यांची बांधकाम सभापती म्हणून निवड झाली. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते यवतमाळ मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून त्यांचा राजकीय आलेख चढउताराचा राहिला. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर 2004 च्या निवडणुकीत ते निवडून आले. परंतु 2009 मध्ये ते विधानसभा निवडणुकीत पुन्हा पराभूत झाले. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत यश मिळविले. त्यांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे असलेले यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ही मदन येरावार यांच्याकडे आले. मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू म्हणून ते ओळखले जातात. ते सध्या 10 खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख