मी कोणाच्याही दबावाला जुमानत नाही : एकनाथ खडसे 

मी कोणाच्याही दबावाला जुमानत नाही : एकनाथ खडसे 

नाशिक : "" मी कोणाच्याही राजकीय दबावाला जुमानत नाही. योग्य वाटते ते बोलतो. समाजाच्या हिताच्या कार्यक्रमात सहभागी होतो. हिरे यांच्या भविष्यातील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणारच,''असा निर्धार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे सध्या पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. पक्षाला राम राम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास खडसे उपस्थित राहणार होते. मात्र न्यायालयीन कामकाजामुळे ते येऊ शकले नाही. 

डॉ.अपूर्व हिरे मित्र मंडळाच्या वतीने वैद्यकीय सहायता केंद्राचे उदघाटन माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. या नियोजित कार्यक्रमाचे उदघाटन खडसे यांच्या हस्ते होणार होते. त्याबद्दल त्यांनी मोबाईल व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे उपस्थितांशी संवाद साधतांना सांगितले की, माझे आणि हिरे घराण्याचे वर्षानुवर्ष पासूनचे संबंध असून त्यांच्या सामाजिक सेवेच्या वैद्यकीय केंद्राच्या उदघाटनासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. तेथे मी जाण्याचे निश्‍चित केले आहे. पण औरंगाबाद उच्च न्यायालयात तारीख असल्याने जाता आले नाही. याचा कोणीही राजकीय विपर्यास करू नये.'' 

मी कोणाच्याही दबावाला जुमानत नाही, अपूर्व चा सामाजिक कार्यक्रम असल्याने तो निश्‍चितपणे कौतुकास्पदबाब असून यापुढील त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला निश्‍चितपणे उपस्थित राहील व त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या अनेक शुभेच्छा आहेत असे खडसे यांनी सांगितले. 

कार्यक्रमास डॉ.अपूर्व हिरे, नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा डॉ.योगिताताई हिरे, श्री शक्ती शैक्षणिक संस्थेचे सचिव दीपक सोनवणे, नगरसेविका प्रतिभा पवार, नगरसेविका पल्लवी पाटील, नगरसेवक मुकेश शहाणे, माजी नगरसेवक सदाशिव माळी, माजी नगरसेवक अरुण काळे, माजी नगरसेवक संजय नवले, लेवा समाज कल्याण मंडळाचे जिल्हाध्यक्ष संजय वायकोळे, खान्देश नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, लेवा समाज बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संदीप येवले, लेवा समाज बहुउद्देशीय संस्थेचे सिडको अध्यक्ष सुनील पाटील आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com