अडचणीत पाठीशी उभे राहिलेल्यांना सत्ता आल्यावर चांगली संधी देणार : शरद पवार - loyal workers will get good opportunity : Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अडचणीत पाठीशी उभे राहिलेल्यांना सत्ता आल्यावर चांगली संधी देणार : शरद पवार

शरद येवले
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मंगरूळपिर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यावर पक्षातील निष्ठावंताना सरकारमध्ये चांगल्या पदावर घेतले जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांची  बुधवारी वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुभाषराव ठाकरे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश डहाके, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक आदी उपस्थिती होते.

शरद पवार म्हणाले की सुभाषराव ठाकरे हे माझ्यासोबत एस काँग्रेसपासून असून वाशिम जिल्ह्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी भक्कमपणे केली. त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली नाही तरी त्यांनी पक्ष न सोडता निष्ठेने पक्षासोबत उभे राहून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठा प्रयत्न करीत आहेत. अशा निष्ठावान नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यच्या सत्तेत स्थापन झाल्यावर प्रमुख पदावर घेतल्या जाईल, अशी ग्वाही दिली.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मधील निष्ठावानांना पक्षाच्या प्रमुख पदावर घेतल्या जाईल असेही पवार यांनी यावेळी  म्हटले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख