अनिल गोटे मेळाव्याला आले पण; राष्ट्रवादीच्या कायर्कर्त्यांची होती वाणवा

...
anil gote
anil gote

शहादा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा काल (ता.८) पक्षाचे निरीक्षक तथा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत झाला. राज्याचा महाविकास आघाडीचा सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसअसताना पक्षाचा या मेळाव्याला कार्यकर्त्यांची उपस्थितीबाबत वाणवा दिसून आला.पक्षाचा पडतीचा काळात पक्ष संघटनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी अनुपस्थित राहत मेळाव्याकडे पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

शहादा येथील तैलिक समाज मंगल कार्यालयात धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मोजून दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

गावित व शितोळेंचे संघटन विस्कटले

विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा हेमलता शितोळे यांनी जिल्ह्यात विशेषतः शहादा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वातावरणाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली होती. पदावर असताना त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुके ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रेलचेल वाढविली होती. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच शहादा विधानसभेत उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा राजेंद्रकुमार गावित यांना होती.मात्र पक्षाकडून विधानसभेसाठी जिल्ह्यात एकही जागा न सोडल्याने श्री. गावित यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. त्यांनी नाराज होऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोठा समूह विखुरला गेला. त्याचे परिणाम निवडणुकीतून दिसून आले.

जि.प.,पं.स.मध्ये अपयश

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य विजयी करता आलेला नाही.पंचायत समितीचा एका जागेवर मिळविलेल्या विजयावर समाधान मानावे लागले.यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तालुक्यात वाताहात झालेली दिसते .त्यातच नुकताच झालेल्या मेळाव्यात मोजून दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांच्या अभाव, वरिष्ठस्तरावरुन होत असलेले दुर्लक्ष हे यामागचे कारण असल्याची चर्चा आहे . आता माजी आमदार गोटे यांनी नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संघटित करून पक्षाचा विस्तारासाठी झुंजार दौरा सुरू केला असला तरी हा दौरा कितपत यशस्वी ठरणार हे येणारा काळात स्पष्ट होईलच यात शंका नाही.

सत्ता असून निष्ठावंत लांबच

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे .राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडतीचा काळात तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाची धुरा सांभाळत जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली होती.अर्थात श्री गावित यांनी पक्ष सोडला .परंतु त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा हेमलता शितोळे हे होते.श्रीमती शितोळे ह्या काही काळ अपवाद वगळता आजही पक्षात आहेत.पक्षाचे कार्य करत आहेत. परंतु पक्षाच्या पडतीच्या काळात जे पदाधिकारी काम करीत होते ते मात्र पक्ष सत्तेत आल्यानंतर दुर्लक्षित झाल्याचे तालुक्याच्या या मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस येणार का ? अशी चर्चाही उपस्थितांमध्ये होत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com