low turnout for ajitdada rally | Sarkarnama

कर्जतची गर्दी पाहून अजितदादा चक्रावले...ओठात एक आणि पोटात दुसरे न ठेवण्याची सूचना!

विकास मिरगणे
गुरुवार, 14 मार्च 2019

कर्जत : कर्जतमधील एका सभेत आज पार्थ पवार यांना धोक्याचा इशारा मिळाला. अपेक्षित गर्दी न झाल्याने चिडलेल्या अजितदादांनी चुकीची आकडेवारी दिल्याच्या कारणावरून थेट व्यासपीठावरूनच नेत्यांना तंबी दिली.
 
राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी खुद्द अजित पवार आता मावळच्या रिंगणात उतरले आहेत. उरण आणि पनवेल मध्ये कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीची सारी भिस्त शेतकरी कामगार पक्षावर अवलंबून आहे. मात्र कर्जतच्या सभेत शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक पुढारीच अनुपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाचे उर्वरित रायगड जिल्ह्यात एक धोरण आणि कर्जतमध्ये वेगळे धोरण हे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. जेमतेम कार्यकर्त्यांसमोर बोलताना ओठात एक आणि पोटात एक अशी भूमिका न ठेवण्याचे अजितदादांनी आवाहन केले. आजची सभा अचानक ठरली आणि लग्नाचा मुहूर्त असल्याचे कारण कमी उपस्थितीसाठी देण्यात आले. कर्जतच्या रॉयल गार्डन लॉन वर झालेल्या यया सभेसाठी आमदार सुरेश लाड, पार्थ पवार, उमेश पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते 

अजित पवारांनी यावेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाची मतदा संख्या आणि मतदान केंद्राची आकडेवारी देण्यात  आली. मात्र यामध्ये तफावत आढळल्याने अजितदादांनी थेट व्यासपीठावरच कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढत शिस्तीचे डोस पाजले. 

सातत्याने दोन निवडणुका जिंकणाऱ्या शिवसेनेचे आव्हान पार्थ पवार कसे पेलणार असा सवाल करताच अजून पार्थ पवार अधिकृत उमेदवार जाहीर झाले नसल्याचे अजित पवार यांनी  यावेळी  माध्यमांशी बोलताना सांगितले. एकूणच कर्जतची सभा पार्थ पवार याना धोक्याची इशारा देणारी ठरली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख