Lost Candidates to meet President to oppose EVM's in election | Sarkarnama

ईव्हीएमला विरोध - पराभूत उमेदवार घेणार राष्ट्रपतींची भेट. पुण्यात फेरनिवडणुकीची मागणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - 'ईव्हीएम'मध्ये झालेले गैरप्रकार लक्षात महापालिकेची फेरनिवडणूक घ्यावी, या मागणीसाठी 'ईव्हीएम' विरोधी कृती समितीचे सदस्य राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची 13 एप्रिल रोजी भेट घेणार आहेत. तसेच 'ईव्हीएम' विरोधी आंदोलन तीव्र करण्यासाठी लवकरच 'भीक मांगो' आंदोलनही छेडण्यात येणार आहे.

'महापालिका निवडणुची मतमोजणी होऊन 1 महिना उलटून गेला तरी, पराभूत उमेदवारांना अजूनही आवश्‍यक ती कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालयात किंवा राज्य अथवा केंद्र सरकारकडे दाद मागता येत नाही. हेतूतः कागदपत्रे देण्यात विलंब करण्यात येत आहे. त्यामुळे या बाबत राष्ट्रपतींकडेच दाद मागणार आहोत,' असे कृती समितीचे तैहसीन पुनावाला, दत्ता बहिरट आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

'ईव्हीएम'मधून दिलेल्या मताची खातरजमा व्हावी, यासाठी त्यातून चिठ्ठी मिळायला हवी, अशी मतदारांची मागणी आहे. मात्र, निधी नसल्याचे कारण सांगून राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कृती समिती भीक मागून राज्य व केंद्र सरकराला निधी देणार आहे. या बाबत दिल्लीतही आंदोलन करण्यात येणार असल्याचे पुनावाला यांनी सांगितले.

'शहरातील 41 प्रभागांतील विसंगती खासदार वंदना चव्हाण यांनी संसदेत उघड केली, तरीही केंद्र आणि राज्य सरकार या बाबत स्पष्टीकरण करण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांना लोकशाहीचा खून पाडायचा आहे,' असा आरोप पाटील यांनी केला.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख