आमदार कर्डिले यांनाच विधानसभेची उमेदवारी : लोणीकर

आमदार कर्डिले यांनाच विधानसभेची उमेदवारी : लोणीकर

राहुरी (नगर) : सरकारच्या कोणत्याही विभागाकडून निधी मिळविण्यात आमदार कर्डिले हुषार आहेत. राहुरी मतदार संघातून त्यांच्याशिवाय इतरांना विधानसभेची उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही. किंबहुना, पुढील मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊ शकतो असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. 

ब्राह्मणी येथे ब्राह्मणी व इतर गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा प्रारंभ करताना लोणीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार शिवाजी कर्डिले होते. ज्येष्ठ नेते ऍड. सुभाष पाटील, भाजप तालुकाध्यक्ष विक्रम तांबे उपस्थित होते. 

लोणीकर म्हणाले, नगर जिल्ह्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांना 80 कोटी रुपये निधी देऊन, योजनांची कामे पूर्ण केली. मुख्यमंत्री पेयजल योजनेमुळे अनेक कामे मार्गी लागली. कर्डिले यांच्या पाठपुराव्यामुळे ब्राह्मणी व चार गावे पाणी योजनेला मंजुरी मिळाली. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याशिवाय इतर कोणीही उमेदवार मतदारसंघात नाही. त्यामुळे राहुरी मतदार संघातून त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. पुढील मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळू शकते. असेही लोणीकर यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com