नागपूर जिल्हा परीषद निवडणुकीसाठी लोकसभेचीच यादी अंतिम राहणार

जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती असतानासुद्धा राज्य निवडणूक आयोगाकडून जोरात तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदचे सर्कल आणि आरक्षण निश्‍चित करण्यात आल्यानंतर आता मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदार संघातील मतदार यादीच ग्राह्य धरण्याचे आदेश आयोगाने दिले असून 7 जूनला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
नागपूर जिल्हा परीषद निवडणुकीसाठी लोकसभेचीच यादी अंतिम राहणार

नागपूर : जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती असतानासुद्धा राज्य निवडणूक आयोगाकडून जोरात तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदचे सर्कल आणि आरक्षण निश्‍चित करण्यात आल्यानंतर आता मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदार संघातील मतदार यादीच ग्राह्य धरण्याचे आदेश आयोगाने दिले असून 7 जूनला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांना अडीच वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला आहे. नियमानुसार फेबुवारी 2017 मध्ये निवडणुक व्हायला हवी होती. मात्र, शासनाने वानाडोंगरी आणि पारशिवनी ग्रामपंचायतचा दर्जा उंचावून नगरपालिका, नगरंपचायत बनविली. त्यामुळे सर्कल रचनेवर परिणाम झाला. आरक्षण 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असल्याने न्यायालयात आव्हान देण्यात आले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सिमा बदलविण्यात आल्याने आयोगानेही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आयोगाने नागपूर वगळता इतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या. त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्याच वेळी बुटीबोरी ग्रामंपचायतला नगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. आरक्षणाचा मुद्दा कायमच होता. त्यामुळे पुन्हा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. 

आता पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणुकीवर स्थगिती दिली आहे. आयोगाकडून मात्र निवडणुकीची कार्यवाही सुरू ठेवण्यात आली आहे. सर्कल आणि आरक्षण निश्‍चित करण्यात आले. आता मतदार यादी अंतिम करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. 7 जूनला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 12 जूनपर्यंत मतदार यादीवर आक्षेप घेता येईल, त्यानंतर 15 जूनला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर 18 जूनला मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com