'लॉकडाऊन' म्हणजे नोटबंदी नव्हे - जयंत पाटील

जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशात लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे
Lockdown should have been announce in day time say Jayant Patil
Lockdown should have been announce in day time say Jayant Patil

पुणे : ''लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणत्याही बाबींची सविस्तर स्पष्टता दिलेली नाही." असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशात लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री लॉकडाउन जाहीर केल्यानंतर जयंत पाटील यांनी फेसबुक पोस्ट करून लॉकडाउनबद्दलची आपली मते जाहीर केली आहेत.'जनतेला वेळ द्यायला हवा होता.'असे त्यांनी म्हटले आहे.

लॉक डाउन मुळे काय झाले आहे हे सांगताना जयंत पाटील यांनी," देशभर अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक सैरभैर होऊन मोठ्या प्रमाणावर किराणा मालाच्या दुकानांकडे धाव घेऊन साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत.  जीवनावश्यक गोष्टींच्याबाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वाच्य नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे. 

या फेसबुक पोस्टमध्ये पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलासा दिला आहे," महाराष्ट्रातील जनतेने गोंधळून जाण्याची गरज नाही.महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन  सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे."असे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com