काश्‍मीरमध्ये लॉकडाउनचे निर्बंध कडक करणार 

काश्‍मीर खोऱ्यातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी लोक विनाकारण बाहेर पडू नयेत म्हणून अडथळे उभारण्यात आले आहेत.
काश्‍मीरमध्ये लॉकडाउनचे निर्बंध कडक करणार 

श्रीनगर : जम्मू- काश्‍मीरमध्ये कोरोनाव्हायरसला प्रतिबंध घालण्‍यासाठी गुरुवारी सलग ३६ व्या दिवशी लॉकडाउनचे पालन केले जात आहे. काही ठिकाणी निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याने लोकांवर कडक बंधने घालण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे.

 
काश्‍मीर खोऱ्यातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी लोक विनाकारण बाहेर पडू नयेत म्हणून अडथळे उभारण्यात आले आहेत. आरोग्यसेवेसह काही अत्यावश्‍यक सेवा निर्बंधांमधून वगळण्यात आल्या असून त्यांच्यासाठी वेगळ्या पासची सोय केली आहे.

काश्‍मीरमधील सर्व बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक बंद असून केवळ औषधे विक्रीची दुकाने, धान्य-भाजीपाल्याच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ४०७ झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ९२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील ६४ हजार नागरिक सरकारी विलगीकरण कक्षांत किंवा घरात एकांतवासात आहेत. 
शाहीद इक्बाल चौधरी, श्रीनगरचे उपायुक्त 


‘कारवा’ची मदत 
दिल्लीतील ‘कारवा- ए- मोहब्बत’ या बिगर सरकारी संघटनेने उत्तर काश्‍मीरमध्ये उरी विभागातील नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) गरजूंना जीवनावश्‍यक वस्तूंचे गुरुवारी वाटप केले. 
‘एलओसी’ जवळील कमलकोट व सुखदरमधील शदरा, छप्पर आणि मोथल या गावांमध्ये ‘कारवा- ए- मोहब्बत’ने मदत पुरवली. याआधी सोपोर शहरातही या संघटनेने वस्तूंचे वितरण केले होते. 

निरीक्षणाखालील व्यक्ती 
६४, ०८९ 
एकूण संख्या 

१५, ३७६ 
घरात एकांतवासात 

५, ८०६ 
सरकारी विलगीकरण कक्षांत 

४२, ३४० 
निरीक्षण काळ पूर्ण केलेल्यांची संख्या 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com