Local Shivsena leaders in rebellious mood against pandurang Barora | Sarkarnama

पांडुरंग बरोरांच्या उमेदवारीविरुद्ध शिवसैनिकांचे बंड

नरेश जाधव
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

खर्डी : आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शहापूर  विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी राजीनामा देऊन शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून एक महिन्यापूर्वी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

खर्डी : आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शहापूर  विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी राजीनामा देऊन शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून एक महिन्यापूर्वी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

त्यांच्या प्रवेशाने तालुक्यात शिवसेनेची ताकद दुप्पट झाली असल्याने पांडुरंग बरोरा यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळेल असे शिवसेनेतून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा, माजी जिप अध्यक्ष मंजुषा जाधव, चंद्रकांत जाधव, ध्यानेश्वर तळपाडे,  अविनाश शिंगे व राजेश म्हसकर यांना वाटत आहे. 

 त्यांनी शहापूर येथील गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद आयोजित करून राष्ट्रवादीतुन सेनेत आलेले आमदार पांडुरंग बरोरा यांच्या उमेदवारीला विरोध केला असून, आमच्या 6 जणांपैकी उमेदवारी न दिल्यास पांडुरंग बरोरा यांचा प्रचार करणार नसल्याचा इशारा माजी आमदार दौलत दरोडा यांच्यासाहित 5 जणांनी दिला . 

Image result for daulat daroda facebook

 

 

 

 

 

तालुकाप्रमुख मारुती धीर्डे व जिल्हाप्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करीत नसल्याचा आरोप केला आहे. आमच्या सहा जणांपैकी कोणालाही उमेदवारी मिळावी म्हणून मातोश्रीला साकडे घातले असल्याचे यावेळी माजी आमदार दौलत दरोडा यांनी सांगितले असून उमेदवारी न मिळाल्यास वेगळा विचार करणार असल्याचा इशारा चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे.

शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार पांडुरंग बरोरा यांनी अनेक शिवसैनिकावर अन्याय केला असून त्यांनी जशी राष्ट्रवादी ताब्यात ठेवली होती तशीच जेष्ठ शिवसैनिकाना बाजूला करून शिवसेना ताब्यात घेतील अशी भीती व्यक्त केली.

शिवसेनेकडून निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी द्या, जोपर्यंत उमेदवाराची घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेश म्हसकर यांनी सांगितले.माजी आमदार दौलत दरोडा यांनी पाच वेळा निवडणूक लढवली असून तीन वेळा आमदारकी मिळाली आहे तर मंजुषा जाधव यांनी जिप अध्यक्षपद व पंचायत समिती सभापतीपद उपभोगले असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहेत.

भाजपात जाणार का?या प्रश्नाला उत्तर देताना माजी आमदार दौलत दरोडा यांनी चांगला माल बाजारात लवकर घेतात असे मिश्किल उत्तर दिल्याने एकच हशा पिकला.सद्या तरी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून उमेदवारी जाहीर झाल्यावर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.

या बंडखोरीच्या इशाऱ्यामुळे शहापूर विधानसभेत निवडणुकीत उमेदवार जास्त असण्याची शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल यावर जय-पराजयाचे गणित अवलंबून असणार असून,युती न झाल्यास तालुक्यात चौरंगी लढत पहावयास मिळेल असे वाटते. 

येत्या सात दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होणार असून कोण कुणाचा झेंडा हाती घेतो हे मतदारांना कळेल पण शिवसेनेची ताकद वाढली असून निष्ठावंत शिवसैनिक फक्त मातोश्री चा आदेश पाळतात हा इतिहास आहे,त्यामुळे सेनेच्या अधिकृत उमेदवाराला विजयाची संधी जास्त असल्याची चर्चा सद्या शहापूर विधानसभा परिसरात आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख