राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराच्या चर्चेने युतीचे इच्छुक उमेदवार हैराण !

कोणी कुठेही जावो मात्र आ.बोंद्रेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Chikhli_MLA_Bondre
Chikhli_MLA_Bondre

चिखली : बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सदैव केंद्रबिंदू राहलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे  विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्या पक्षबदलाच्या चर्चांनी सोशल मिडीयासह सर्वच माध्यमांमध्ये एकीकडे प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे .

 मात्र  विरोधी पक्षातील अनेक इच्छूक उमेदवार या संभाव्य पक्षांतराने हैराण झाले आहेत . आपली आमदारकीची संधी तर हुकणार नाही ना?  या विंवचनेत हे इच्छुक दिसत आहेत . 

 सोशल मिडीया व इतर माध्यमांवर आमदार राहुल बोंद्रे यांच्या पक्षबदलाच्या तळ्यात मळ्यात या वृत्तांमुळे भाजपसह सर्वच पक्षातील उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. एकीकडे आ.राहुल बोंद्रेच्या भाजपा प्रवेशाबद्दल राजकीय वर्तुळासह सामाजिक क्षेत्रात तर्कविर्तक लावले जात आहेत .

राहुल बोन्द्रे भाजप सोडून शिवसेनेच्या प्रवेशाच्या वावड्यादेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र या चर्चा सर्वत्र होत असतांना आपण कुठेच जात नसून काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे राहुल बोन्द्रे  सांगत आहेत . 

अलीकडेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकूल वासनिक यांनी मतदारसंघात धावती भेट देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आ.राहुल बोंद्रे यांचेशी झालेल्या गुप्त चर्चेवरही त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून  आहे. जर आ.बोंद्रे यांनी पक्षांतर केले तर  मतदारसंघाची  सर्वच समीकरण बदलणार आहेत .   

भाजपकडून अ‍ॅड.विजय कोठारी, सौ.श्वेता महाले, सुरेशआप्पा खबुतरे, धृपतराव सावळे, कुणाल बोंद्रे, संजय चेके पाटील आदी इच्छुक आहेत .  इच्छूक उमेदवारांनी आपल्याच  तिकीटावर  शिक्कामोर्तब होणार असल्याच्या अविर्भावात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली दावेदारी ठोकली आहे. एकीकडे शिवसेनेकडून भास्करराव मोरे व प्रा.नरेंद्र खेडेकर हे देखील इच्छुक आहेत. 

वंचितची जोरदार तयारी 
चिखली विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने देखील जोरदार तयारी चालविली असून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. वंचितकडून निसार हाजी, उबेदअली खान हे इच्छूक असून त्यांनी याकरिता कंबर कसल्याचे दिसत आहे. भाजप-सेनेची युती होत असल्याचे अंदाज बांधले जात असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी देखील वंचितसोबत आघाडी करण्यास इच्छूक असणार आहे. 

लोकसभेत वंचितच्या धक्कादायक कामगिरीमुळे विधानसभेतदेखील वंचित तिसरा पक्ष म्हणून पुढे येण्याचा चिन्हे निर्माण झालेली दिसून येत आहे. भाजप-सेनेसह काँग्रेसचे पदाधिकारी आजमितीस संभ्रमात असून चिखली मतदारसंघात पक्षबदलाच्या विविध चर्चांना उधाण आले आहे. आ. बोंद्रे पक्षबदल करतील किंवा नाही हे जरी येणारा काळ ठरवित असले तरी त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांमुळे त्यांच्यासोबत कोण-कोण जाणार याबाबतही काथाकूट होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com