Loan Waiver will be on Till Last Farmer Gets Relief Say Devendra Fadanavis | Sarkarnama

शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी सुरुच राहील : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

''विरोधी पक्ष निवडणुकीत गावा-गावासाठी अन्‌ तालुक्‍यासाठीही आश्वासने देत आहेत. त्यांना खात्री नसल्यानेच ते अशी वारेमाप आश्‍वासने देत आहेत. आमच्या सरकार मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत आमची शेतकरी कर्जमाफी सुरु राहील. शेतकऱ्यांनी निर्धास्त रहावे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सटाणा : ''विरोधी पक्ष निवडणुकीत गावा-गावासाठी अन्‌ तालुक्‍यासाठीही आश्वासने देत आहेत. त्यांना खात्री नसल्यानेच ते अशी वारेमाप आश्‍वासने देत आहेत. आमच्या सरकार मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत आमची शेतकरी कर्जमाफी सुरु राहील. शेतकऱ्यांनी निर्धास्त रहावे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानसभा निवडणुक प्रचारासाठी आज त्यांची सटाणा येथे सभा झाली. यावेळी ते म्हणाले, ''कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे पंधरा वर्षे सत्ता होती. तेव्हा त्यांना जनतेचा विचार करता आला नाही. कामे करता आली नाहीत. त्यांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरण्याचे काम केले. नीट वागले असते तर जनतेने त्यांना सत्तेबाहेर घालवले नसते. आता ते जमिनीवर आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ते वारेमाप आश्‍वासन देत सुटलेत. मात्र जनता त्यांना भुलणार नाही. भाजप, शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेत येणार आहे.''

ते पुढे म्हणाले, ''आम्ही गेली पाच वर्षे सातत्याने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. त्यांना विविध सवलती व योजना दिल्या. त्यामुळे शेतकरी स्वावलंबी होण्याच्या दिशेने काम झाले आहे. कॉंग्रेस आघाडीच्या सरकारने पंधरा वर्षात देशातील शेतकऱ्यांना तुटपुंजी कर्जमाफी दिली. आम्ही दहा हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. शेवटच्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरुच राहील.'' यावेळी महायुतीचे उमेदवार दिलीप बोरसे, मंत्री जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे, शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख