lingayat community and state government | Sarkarnama

एकच मिशन, लिंगायत आरक्षण : शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

सुशांत सांगवे
सोमवार, 30 जुलै 2018

लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच भेटणार आहे. या भेटीत लिंगायत समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविल्या जाणार आहेत. आरक्षणाबाबत त्यांनी ठोस निर्णय घेतला नाही तर व्यापक आंदोलनाची दिशा लिंगायत समाजातर्फे ठरवली जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाची लिंगायत महासंघातर्फे काल रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याच्या वेगवेगळया भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच भेटणार आहे. या भेटीत लिंगायत समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविल्या जाणार आहेत. आरक्षणाबाबत त्यांनी ठोस निर्णय घेतला नाही तर व्यापक आंदोलनाची दिशा लिंगायत समाजातर्फे ठरवली जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाची लिंगायत महासंघातर्फे काल रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याच्या वेगवेगळया भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण लागू व्हावे. यासाठी सरकारने शुद्धीपत्रक काढावे, यावर बैठकीत जोर देण्यात आला. "एकच मिशन, लिंगायत आरक्षण' अशा घोषणाही देण्यात आल्या. 

या वेळी महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार, चंद्रकांत तोळमारे, प्रा. रामदास मिरजगावे, शेखर हवेली, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनायक शेटकार, विश्वनाथ मिटकरी, माणिक मरळे, प्रभाकर धमगुंडे, नाना लखादिवे, बाबुराव माशाळकर परमेश्वर पाटील उपस्थित होते. प्रा. बिरादार म्हणाले, लिंगायत समाजाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ आठवडभरात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आम्ही शांतता प्रिय आहोत. अहिंसावादी आहोत. पण सरकार आमच्या भावना समजून घेत नसेल तर लिंगायत समाजही रौद्ररूप धारण करेल. मात्र सध्या लिंगायत समाज शांत आहे. सरकारने लिंगायत समाजाला आरक्षण देऊ, अशी घोषणा पूर्वी केली होती. ती अद्याप प्रत्यक्षात उतरली नाही. त्यामुळे फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक पुन्हा होऊ नये. 
तातडीने पावले उचलावीत... 
फक्त तोडफोड केल्यानंतरच सरकार जागे होते. सरकारची ही भूमिका अयोग्य आहे. सरकारने लिंगायत समाजाला आरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. असे मत लिंगायत महासंघाचे अध्यक्ष सुदर्शन बिरादार यांनी व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख