आम्हालाही माणसासारख जगू द्या, पाकिस्तानातील हिंदु, ख्रितींचा आक्रोश 

लॉकडाऊनमुळे तर पाकिस्तानचे कंबरडे आणखी मोडले आहे. त्याउलट भारतात कोरोनाला रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश आल्याचे दिसून आले आहे.
 आम्हालाही माणसासारख जगू द्या, पाकिस्तानातील हिंदु, ख्रितींचा आक्रोश 

पुणे : कोरोनामुळे संपूर्ण जग भयभयीत असून प्रत्येकजण संकटातील माणसांच्या मदतीसाठी हात पुढे करीत आहे. मात्र पाकिस्तान त्याला अपवाद आहे. येथे अल्पसंख्याकांना सापन्तभावाची वागणूक दिली जात आहे.

हिंदू आणि ख्रिश्‍चन धर्मियांना लॉकडाऊनच्या काळात रेशन आणि जीवनावश्‍यक वस्तू नाकारल्या जात असून भूकेने लोक व्याकूळ झाले आहेत. 

आम्हाला कोणी न्याय देईल असा आक्रोश सुरू आहे पण, हा आक्रोश पंतप्रधान इम्रान खान यांच्या कानापर्यंत पोचलेला दिसत नाही. सोशन मीडियाच्या माध्यमातून सिंधप्रांतातील हिंदू आणि ख्रिश्‍चन धर्माच्या लोकांनी तेथे कसा अन्याय होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आम्ही अल्पसंख्याक असल्याने आम्हाला रेशन दिले जात नाही. कोणतीही मदत केली जात नाही. आम्ही घरात आहोत. घरातून बाहेर पडता येत नाही. आम्ही काय खायचे ? 

कोरोनाऐवजी आमचा जीव उपासमारीनेच जाऊ शकतो. मात्र येथील सरकारही न्याय देत नाही. उलट आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या कथा आणि व्यथा मांडताना या प्रांतातील अल्पसंख्याक भयभयीत झालेले दिसत आहेत. 

लॉकडाऊनमुळे तर पाकिस्तानचे कंबरडे आणखी मोडले आहे. त्याउलट भारतात कोरोनाला रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश आल्याचे दिसून आले आहे. देशातील गरीबांची माफी मागतानाच गरीबांना कशी मदत मिळेल यासाठी त्यांनी आवाहन केले आहे.

भारतात संकटाच्या काळात सर्व पक्ष आपआपसातील मतभेद विसरून लॉकडाऊनला साथ देतच आहेत त्याशिवाय गरजूना कोणताही धर्म, पंथ, जात न पाहता मदत केली जात आहे. हे चित्र इतर देशांच्या तुलनेत आशादायी आहे. 

पाकिस्तानातील हिंदू आणि मुस्लिमांचे म्हणणे आहे, की आम्ही हिंदू, मुस्लिम असलो तरी पाकिस्तानी नागरिक आहोत. आम्ही गरीब आहोत, आमचीही मुलंबाळ आहेत त्यांची काळजीही सरकारने घेतली पाहिजे.

आम्हाला सोडून केवळ एकाच धर्मियांना म्हणजे मुस्लिमांनाच मदत केली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला रेशन का दिले जात नाही. संकटात तरी भेदभाव करू नये असे आवाहन केले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com