माजी आमदार निशीगंधा मोगलांच्या घराशेजारी बिबट्याचा मुक्काम 

गेले काही दिवस शहरातील मखमलाबाद शिवारात वावर असलेल्या बिबट्या सकाळी सावरकरनगर या मध्यवस्तीतील माजी आमदार निशीगंधा मोगल यांच्या घराजवळ प्रकटला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.
माजी आमदार निशीगंधा मोगलांच्या घराशेजारी बिबट्याचा मुक्काम 

नाशिक  : गेले काही दिवस शहरातील मखमलाबाद शिवारात वावर असलेल्या बिबट्या सकाळी सावरकरनगर या मध्यवस्तीतील माजी आमदार निशीगंधा मोगल यांच्या घराजवळ प्रकटला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मोगल आणि भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार डॉ. निशीगंधा मोगल यांच्या निवासस्थानासमोर प्रकट झाला. सकाळी शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या नागरीकांना हा बिबट्या दिसला. त्यानंतर तातडीने वन विभागाला व पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात वनविभागाचे कर्मचारी जखमी झाले. 

गंगापूर रोडवर बिबट्या दिसल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने बिबट्या आक्रमक झाला. वन विभागाचे उत्तम पाटील, शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड व पत्रकार तबरेज शेख व कपिल भास्कर हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जायबंदी करण्यात यश आले. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com