Learn something from Yogi- Uddhav to Maha CM | Sarkarnama

योगी आदित्यनाथांकडून थोडे गांभीर्य उधार घ्या -शिवसेनेचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 एप्रिल 2017

मुख्यमंत्रिपदाची वगैरे शपथ गंभीरतापूर्वक घेण्याची परंपरा आहे. पण राज्यकर्ते खुर्च्यांवर बसल्यावर किती गांभीर्याने काम करतात हा प्रश्नच आहे. नुसते चेहऱ्यांवर गांभीर्याचा मुखवटा लावून चालत नाही, तर तो गंभीर रस कृतीत उतरावा लागतो. नाहीतर त्याची अवस्था महाराष्ट्र सरकारसारखी होते- उद्धव ठाकरे

मुंबई : उत्तरप्रदेश सरकारने शेतक-यांना कर्जमाफी दिली पण महाराष्ट्र सरकार योगी मॉडेलचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. दुसऱ्यांचा पाळणा हलविण्यापेक्षा स्वतःचा पाळणा हलवून विकासाचे पोर कधी केकाटणार हे जरा गांभीर्याने घ्या. नाहीतर महाराष्ट्राचे देशाच्या नकाशावरील गांभीर्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही अशी खरमरीत टीका शिवसेनेने आज पुन्हा एकदा केली.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. आमचे सरकार योगी योगी मॉडलचा विचार करून निर्णय घेणार आहे. हा अभ्यास पूर्ण होईपर्यंत अजून दहा हजार शेतकरी प्राण सोडतील याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्रिपदाची वगैरे शपथ गंभीरतापूर्वक घेण्याची परंपरा आहे. पण राज्यकर्ते खुर्च्यांवर बसल्यावर किती गांभीर्याने काम करतात हा प्रश्नच आहे असे स्पष्ट करून शिवसेनेने म्हटले आहे नुसते चेहऱ्यांवर गांभीर्याचा मुखवटा लावून चालत नाही, तर तो गंभीर रस कृतीत उतरावा लागतो. नाहीतर त्याची अवस्था महाराष्ट्र सरकारसारखी होते. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून थोडे गांभीर्य उधारीवर घ्यायला हवे, असे उद्धव यांनी म्हटले आहे. योगींचे अन्नपूर्णा कॅन्टीन किंवा जयललितांनी सुरू केलेले अम्मा कॅन्टीन हा शिवसेनेच्याच वडापाव योजनेचा पुढील आविष्कार आहे असाही दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख