चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे आयारामांची घालमेल

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्यासह अनेक नेते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपात गेले होते. या प्रवेश सोहळयाला भाजपानेच 'मेगाभरती' असे गोंडस नाव दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत यापैकी अनेकजन पराभूत झाले.
Many New leades restless due to Chandrakant Patil Statement
Many New leades restless due to Chandrakant Patil Statement

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'पक्षात मेगाभरती केल्यामुळे भाजपची संस्कृती बिघडली' असे विधान केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांची घालमेल सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कसे चालते हे बघून चारसहा महिन्यात स्वगृही परत जावू, असे कॉंग्रेसमधून भाजपात गेलेल्या एका नेत्याने सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्यासह अनेक नेते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपात गेले होते. या प्रवेश सोहळयाला भाजपानेच 'मेगाभरती' असे गोंडस नाव दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत यापैकी अनेकजन पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेवर येण्याचे चिन्ह होते. 

परंतु, मुख्यमंत्री पदावरून युती तुटली आणि शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे भाजप आणि त्या पक्षात गेलेल्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर थेट राज्याच्या नेतृत्वावरच तोड डागली. पंकजा मुंडे देखिल अस्वस्थ असल्याची बाब लपून राहिली नाही. त्यातच सत्तेसाठी भाजपात दाखल झालेले नेते हवालदील झाल्याची कुजबूज सुरू आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनीच मेगाभरतीमुळे पक्षाची संस्कृती बिघडल्याचे विधान केल्याने या नेत्यांमध्ये घालमेल सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com