आरोप सोडुन नेत्यांनी श्रमदान केले अन्‌ बुजलेल्या बारवाला लागले पाणी! 

सबंध महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. अनेक शहरांना टॅंकरसाठी महिनाभर वाट पहावी लागते. यामध्ये राजकीयदृष्ट्या नेहेमीच तापलेले अन्‌ जागरुक असलेल्या सिन्नरचाही अपवाद नाही. मात्र, यावेळी पाण्यासाठी प्रशासन, सरकार, नेत्यांवर टिका न करता येथील नगराध्यक्ष किरण डगळे आणि शिवसेना नेते हेमंत वाजे यांच्या पुढाकाराने विविध कार्यकर्ते पुढे आले. बुजलेल्या पुरातन बारवातील कचरा, गाळ काढुन त्याला जिवंत केले. आता या बारवाला पाणी लागल्याने नागरीक आनंद व्यक्त करत आहेत.
आरोप सोडुन नेत्यांनी श्रमदान केले अन्‌ बुजलेल्या बारवाला लागले पाणी! 

सिन्नर : सबंध महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. अनेक शहरांना टॅंकरसाठी महिनाभर वाट पहावी लागते. यामध्ये राजकीयदृष्ट्या नेहेमीच तापलेले अन्‌ जागरुक असलेल्या सिन्नरचाही अपवाद नाही. मात्र, यावेळी पाण्यासाठी प्रशासन, सरकार, नेत्यांवर टिका न करता येथील नगराध्यक्ष किरण डगळे आणि शिवसेना नेते हेमंत वाजे यांच्या पुढाकाराने विविध कार्यकर्ते पुढे आले. बुजलेल्या पुरातन बारवातील कचरा, गाळ काढुन त्याला जिवंत केले. आता या बारवाला पाणी लागल्याने नागरीक आनंद व्यक्त करत आहेत. 

सिन्नर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून बुजलेल्या अवस्थेतील बारबाचे काम विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने हाती घेतले. ते सगळे कामाला लागले अन्‌ २० ते २५ दिवसांच्या अखंड श्रमदानानंतर बारवाला पाणी लागले. शिवराय कला क्रीडा मित्र मंडळ, इच्छामणी मित्र मंडळ, तुफान आलया जल मित्र मंडळाद्वारे महाश्रमदान करून गाळ काढण्याचे कार्य अद्यापही सुरुच आहे. सिन्नर नगरपरिषदेचे गटनेते हेमंत वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, नगरसेवक प्रमोद चोथवे, विजय जाधव, बाळासाहेब उगले, श्रीकांत जाधव, रुपेश मुठे, संतोष शिंदे, नगरसेविका विजया बर्डे, सिन्नर नगरपरिषदेचे कार्यालय निरीक्षक विष्णू क्षत्रिय, मणिलाल चौरे, विजय वाजे यांनी महाश्रमदान केले. या कालावधीत नगरसेवक विजय जाधव व कल्पना रेवगडे यांनी श्रमदान करून आपला वाढदिवस साजरा केला. उन्नती शहर स्तरीय संघाच्या महिला सदस्यांनी देखील गेल्या चार दिवसांपासून सहभाग घेतला.  यामध्ये पत्रकार, डॉक्‍टर्स, स्वयंसेवक यांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अगदी लहान मुलही सहभागी होत त्यांनी रिकाम्या पाट्या पोहचविण्याचे काम केले. 

हे सर्व जण रोज नियमितपणे तीन तास श्रमदान करीत होते. दुर्गादास बैरागी, नितीन खिंवसरा, चंदन देशमुख, राजेंद्र क्षत्रिय, जितेन क्षत्रिय, अनिल जाधव आदींनी त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली. महावीर खिंवसरा, दत्ता बोऱ्हाडे, श्‍याम गवळी, राजेंद्र क्षत्रिय, विठ्ठल गोबडे, शिरीष ठाणेकर, नरेंद्र भाटजिरे, भूषण देशमुख आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पाणीदार श्रमदानात सहभागी झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com