पक्षाच्या नेत्यांनी पैशांसाठी मला त्रास दिला; नाशिक भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

BJP Leader Uddhav Nimse Handed over Charge to MNS Leader Ashok Murtadak
BJP Leader Uddhav Nimse Handed over Charge to MNS Leader Ashok Murtadak

नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापतींची मुंदत आज संपली. यावेळी कार्यभार सोडतांना भारतीय जनता पक्षाच्या सभापतींनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांवरील केलेल्या आरोपांनी खळबळ निर्माण झाली. ते म्हणाले, "मला पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पैशांसाठी त्रास दिला. नगरसेवकांना अनुपस्थित राहण्याच्या सूचना केल्या.''त्यामुळे जाता जाता त्यांनी चक्क मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडे हंगामी सभापतीपद सोपविले.

त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी भाजपचा एक गट 'मनसे'शी जवळीत करीत आहे. या भाजपचे पार्श्‍वभूमीवर मावळते सभापती निमसे यांनी पदभार सोडतांना "महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विविध प्रकारे दबाव आनला. पक्षाच्या सदस्यांना गैरहजर राहण्याच्या सूचना केल्या. मला पैशांसाठी त्रास देण्यात आला.'' असा सनसनाटी आरोप केला. त्यामुळे महापालिकेत 'पार्टी विथ डिफरन्स'चा दावा करणाऱ्या भाजप पक्षात सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारने सभापती निवडणुकीला स्थगिती दिली आहे. स्थायी समिती सदस्यांच्या संख्येवरून उच्च न्यायालयात भाजपने दावा दाखल केला आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी झालेल्या सभेत भाजपचे सभापती उद्धव निमसे यांनी हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर्तडक यांची नियुक्ती करून ट्विस्ट निर्माण केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 157 कोटींच्या भूसंपादन प्रस्तावावरून निमसे यांना भाजप, शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने तोडीस तोड म्हणून निमसे यांनी धक्का दिल्याचे मानले जात आहे.

स्थायी समितीच्या शेवटच्या कार्यकाळात 157 कोटींचे भूसंपादनाचे प्रस्ताव मंजुरीला आणले जाणार आहेत. त्याचा धसका घेत हे विषय स्थायीऐवजी महासभेवर सादर करण्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आदेशित केले होते. त्यानंतर सभापती निमसे यांनी हा स्थायी समितीचा अधिकार असल्याचा दावा केला. न्यायालयीन आदेश असलेले प्रस्ताव स्थायी समितीवर सादर करण्याचे आदेशित केले होते. या प्रकरणात सभापती निमसे यांची त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी कोंडी केली. त्याला चेकमेट करण्यासाठी निमसे यांनी मुर्तडक यांची नियुक्ती केली होती. सभापतिपदी 'मनसे'चे मुर्तडक यांची नियुक्ती जाहीर केल्यानंतर सदस्य दिनकर पाटील, संतोष साळवे, पुष्पा आव्हाड, भाग्यश्री ढोमसे, कल्पना पांडे यांनी अभिनंदन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com