इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ सर्व पक्षीय नेते एकवटले

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले येथे आज झालेल्या मोर्चा व निषेध सभेस सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी हजेरी लावली
Leaders of All Political Parties Gathered to Support Indorikar Maharaj
Leaders of All Political Parties Gathered to Support Indorikar Maharaj

अकोले :  इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले येथे आज झालेल्या मोर्चा व निषेध सभेस सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे, भाजपचे माजी मंत्री मधुकर पिचड आदींबरोबर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सभेत उपस्थिती दर्शविली.

निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत गेल्या आठ दिवसांपासून जोरदार वाद उभळला आहे. इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुर्लन समिती तसेच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नगरला येऊन निवेदन दिले होते. हा वाद मिटावा, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील सर्वच नेते व्यक्त करीत असताना देसाई यांनी मात्र महाराजांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. 

या पार्श्वभूमीवर आज अकोले तालुक्यात वारकरी सांप्रदाय, भाजप महिला आघाडी, अकोले तालकु्यातील नागरिकांनी एकत्रित येवून मोठा मोर्चा काढला. या मोर्चासाठी नगरहून शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर उपस्थित राहिल्या. निषेध सभेस आमदार लहामटे, माजीमंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आदींसह शेकडो कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.

निषेध सभेत मान्यवरांनी आक्रमक भाषण करून देसाई यांना अकोले तालुक्यात पायही ठेवू दिला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com