दिंडोरीच्या आघाडीने ठरेल खासदार कोण? भारती पवार की धनराज महाले? 

दिंडोरीचा खासदार कोण?, याचे उत्तर तिन्ही उमेदवारांचे गृहमतदारसंघ असलेले कळवण आणि दिंडोरी हे सर्वाधीक मतदान झालेले मतदारसंघ ठरवतील, असे चित्र आहे. येथे मोठा लिड मिळण्याची शक्‍यता आहे. हा एकतर्फी लिड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महालेंच्या पत्थ्यावर की भाजपच्या भारती पवार यांना लाभदायक ठरतो, यावर दिंडोरीचा खासदार ठरेल.
Dhanraj Mahale - Bharati Pawar - JP Gavit
Dhanraj Mahale - Bharati Pawar - JP Gavit

नाशिक : दिंडोरीचा खासदार कोण?, याचे उत्तर तिन्ही उमेदवारांचे गृहमतदारसंघ असलेले कळवण आणि दिंडोरी हे सर्वाधीक मतदान झालेले मतदारसंघ ठरवतील, असे चित्र आहे. येथे मोठा लिड मिळण्याची शक्‍यता आहे. हा एकतर्फी लिड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महालेंच्या पत्थ्यावर की भाजपच्या भारती पवार यांना लाभदायक ठरतो, यावर दिंडोरीचा खासदार ठरेल. 

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघ समाविष्ट आहे. येथे 1.80 लाख (66.12 टक्के) मतदान झाले. दिंडोरी मतदारसंघाची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने भुजबळ यांच्यावर सोपवली होती. त्यादृष्टीने भुजबळ यांनी शेवटच्या टप्प्यात येथे लक्ष घालुन सभा घेतल्या. मात्र पक्षातील एक गटात पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या भारती पवार यांच्या विषयी सहानुभूती होती. भाजपला यापुर्वीच्या तिन्ही निवडणुकांत येथुन आघाडी होती. हा संदर्भ विचारात घेता यंदा काय होते, याला महत्व आहे. अशा स्थितीत येवल्यातुन पुन्हा भारती पवार यांना आघाडी मिळाल्यास त्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो. 

दिंडोरी हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांचा गृहमतदारसंघ आहे. येथे सर्वाधीक 2.26 लाख (75 टक्के) मतदान झाले. येथील आमदार नरहरी झीरवाळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे हे संदर्भ त्यांना अनुकूल आहेत. यामध्ये पेठच्या आदिवासी भागात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव आहे. मात्र, तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस तेव्हढीच सक्रीय आहेत. अशा स्थितीत श्री. महाले यांना येथुन मोठी आघाडी मिळाल्यास त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची दमछाक होईल. त्यामुळे महालेंच्या विजयाची वाट सोपी होऊ शकते. 

कळवण हा (कै) ए. टी. पवार यांना मानणारा मतदारसंघ आहे. त्यांच्या स्नुषा भारती पवार व पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मात्र सध्या भाजपच्या उमेदवार आहेत. या मतदारसंघाला सुरगाणा हा माकपचा बालेकिल्ला जोडलेला आहे. आमदार जे. पी. गावीत यांचा तेथे प्रभाव आहे. ते कळवणचे आमदार आहेत. येथे पवार यांच्या कुटुंबातील नितीन पवार राष्ट्रवादीचा प्रचार करीत आहेत. या दोन्ही बाबी भारती पवार यांच्या आघाडीत अडथळा आहे. ही कळवणची राजकीय मेख आहे. त्यावर भारती पवार किती गतीने धावणार हे ठरेल. 

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच इच्छुक तसेच विद्यमान आमदारांनी सुरु केली आहे. त्यामुळे आपली आघाडी कायम रहावी यासाठी प्रत्येक इच्छुकाची धडपड सुरु आहे. यापुव्रीचा कल पाहता लोकसभा निवडणुकीत भाजपला आघाडी असली तरी विधानसभा निवडणुकीत चांदवड वगळता उर्वरीत सर्व पाच मतदारसंघात भाजप तिसऱ्या स्थानी राहिला आहे. त्यादृष्टीने कोणते नेते व आमदार कोणत्या पक्षाला किती मताधिक्‍य देतात याची त्यांच्यात चढाओढ आहे. त्याचा विचार करता उमेदवारांचे घरचे मतदारसंघ असलेल्या कळवण आणि दिंडोरीत कोण किती आघाडी घेतो? स्वतःच्या बालेकिल्ल्यात किती व कशी कामगिरी करतो यावर दिंडोरीचा खासदार ठरेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com