"बारगेनिंग करताना लाज नाही वाटत ?' 

मोदींच्या "अच्छे दिन'च्या घोषणेला आम्हीही प्रतिसाद दिला. मी स्वतः: भाजपला मतदान केले. मात्र तीन वर्षात कुठे आले आहेत अच्छे दिन ? मोदींचे मित्र असलेल्या अंबानी, अडाणी यांचेच अच्छे दिन दिसतात.- लक्ष्मी त्रिपाठी
 "बारगेनिंग करताना लाज नाही वाटत ?' 
"बारगेनिंग करताना लाज नाही वाटत ?' 

पुणे :"शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय सरकारला बाजाराप्रमाणे वाटतो. त्यामुळे बारगेनिंगची भाषा सुरू आहे. हे करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे', अशा शब्दांत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्‍वर लक्ष्मी त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे न घेता कठोर टीका केली. 

सोमवारी सकाळी गंजपेठेतील महात्मा फुले वाड्यात खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्‍लेष यात्रेला सुरवात झाली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्रिपाठी उपस्थित होत्या. यावेळी त्यांचे जोरदार भाषण झाले. त्याला उपस्थितांनी जोरदार पाठिंबा दिला. त्यानंतर त्रिपाठींनी माध्यमांशी संवाद साधला. 

कर्जमाफी दिली तर आत्महत्या होणार नाहीत याची हमी द्या, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भूमिकेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, आत्महत्या हा बाजार आहे काय ? कोणाबरोबर बारगेनिंग करता ? काय लावलय तुम्ही? जस्टिस वर्मा यांच्या ऑर्डरमुळे बलात्कारावर कायदा आला म्हणून बलात्कार थांबले कां? शेतकऱ्यांवर सद्या बलात्कारच सुरू आहे. दुसरे काय आहे हे? 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबद्दल त्या म्हणाल्या, समाजाने जाग्रत झाले पाहिजे. आपल्याला शेतकरी जगवतात, याची जाण ठेवून त्यांच्यासाठी काम करायला पाहिजे. मातीचे मोल, शेतकऱ्यांचा अभिमान नसलेल्या सुशिक्षितांची संख्या मोठी आहे. राजकीय वक्‍तींची तर चांगले करण्याची इच्छाशक्‍ती नाही. मात्र किन्नर लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. माझ्या श्‍वासात श्‍वास आहे तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबरोबर राहणार आहे, असे त्रिपाठी म्हणाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com