सोलापूरची पोटनिवडणूक लागली तर ढोबळे भाजपचे उमेदवार?

laxmanrao dhobale about solapur bielection
laxmanrao dhobale about solapur bielection

पंढरपूर : सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीचे प्रमाणपत्र  रद्द केल्याचा निकाल आला आहे. त्यानंतर आता पोटनिवडणूक लागणार की निकालाला न्यायालयात आव्हान दिले जाणार, याची चर्चा सुरू असतानाच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी संभाव्य पोटनिवडणुकीसाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे.

भाजपाने जर पक्षादेश दिला तर आपण सोलापूर लोकसभा पोटनिवडणूक लढण्यास तयार आहोत, असे ढोबळे यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अपात्र ठरवले.  महास्वामी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा कडून खासदार झाले होते. त्यावेळी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे देखील इच्छुक होते. 

यापरिस्थितीत लोकसभेची निवडणूक लागली आणि पक्षाने संधी दिली तर आपण निवडणूक लढवू, असा ठाम विश्वास ढोबळे यांनी व्यक्त केला. असे जरी असले तरी महास्वामींचे प्रमाणपत्र उच्च न्यायालयात खरे ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com