सुधाकर परिचारक यांना निवडून द्या - लक्ष्मण सवदी

देशात तसेच कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार असून महाराष्ट्रात ही भाजप-सेना युतीचे सरकार येणार असल्यान व सत्तेतील शासक (आमदार) असेल तरच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार असल्यामुळे सत्तेत जाणाऱ्या सुधाकरपंतांना आशीर्वाद देऊन पंढरपूर मंगळवेढ्याचा विकास साधावा, असे आवाहन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्‍मण सवदी यांनी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती व बोराळे येथील कन्नड भाषिक मतदारांना कन्नड भाषेतून आव्हान करताना केले.
सुधाकर परिचारक यांना निवडून द्या - लक्ष्मण सवदी

भोसे (ता. मंगळवेढा) - देशात तसेच कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार असून महाराष्ट्रात ही भाजप-सेना युतीचे सरकार येणार असल्यान व सत्तेतील शासक (आमदार) असेल तरच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार असल्यामुळे सत्तेत जाणाऱ्या सुधाकरपंतांना आशीर्वाद देऊन पंढरपूर मंगळवेढ्याचा विकास साधावा, असे आवाहन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्‍मण सवदी  यांनी मंगळवेढा तालुक्यातील  हुलजंती व बोराळे येथील कन्नड भाषिक मतदारांना कन्नड भाषेतून आव्हान करताना केले. 

पंढरपूर मंगळवेढ्यातील भाजप-सेना रयतक्रांती युतीचे  उमेदवार सुधाकर  परिचारक यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्याच्या कर्नाटक सीमावर्ती भागातील हुलजति व  बोराळे याठिकाणी कन्नड भाषिक मतदारांसाठी कर्नाटक चे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुधाकरपंत परिचारिक, आमदार प्रशांत परीचारक, नितीन पाटील, भारत पाटील, शिवानंद पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आदींसह मान्यवर उपस्थीत होते.
 
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सुधाकरपंत  यांच्यासारखा ज्येष्ठ  नेत्याची  उमेदवारी लाभणे हे मतदारसंघाचे भाग्य असून सुधाकरपंत हे सहकारातील एक ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तिमत्व असलेने  व त्यांना सहकाराचा मोठा अनुभव असल्यामुळे आपले मतरुपी दान त्यांना देऊन पंढरपूर व मंगळवेढ्याचा विकास साधून  घेण्याची फार मोठी संधी  या मतदारसंघातील मतदारांना आली असल्याने या संधीचं सोनं करून घ्यावं असे आव्हान त्यांनी बोराळे येथील प्रचार सभेत मतदारांना केले.
 
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी कन्नड व मराठी या दोन्ही भाषेतून संबोधित करत गेल्या दहा वर्षात पाण्याची आमिषे दाखवून सत्ता भोगली आहे. सत्ता भाजप सेनेची येणार आहे व हेच सरकार तुमचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवनार असलेने सुधाकरपंत परीचारक यांना विजयी करण्याच आवाहन केले.

यावेळी   बोराळे, नंदुर, सिद्धापूर, अरळी,  सोड्डी, शिवणगी, येळगी  या भागातील बहुसंख्य कन्नड भाषिक ग्रामस्थ अतिशय उत्सुकतेने सभा ऐकण्यासाठी  उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com