दोनशे उमेदवार उभारुन निवडणूक प्रक्रिया कोलमडून टाका : लक्ष्मण मानेंचा अजब सल्ला

ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 150 ते 200 हून अधिक उमेदवार उभा करुन निवडणूक प्रक्रियाच कोलमडून टाकावी, असा अजब सल्ला माजी आमदार व महाराष्ट्र वंचित आघाडीचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी दिला आहे.
Laxman Mane
Laxman Mane

सोलापूर  : ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 150 ते 200 हून अधिक उमेदवार उभा करुन निवडणूक प्रक्रियाच कोलमडून टाकावी, असा अजब सल्ला माजी आमदार व महाराष्ट्र वंचित आघाडीचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी दिला आहे. 

काल माने यांनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. माने म्हणाले, "भाजपला सत्ता गुणवत्तेवर नव्हे तर ईव्हीएमच्या घोटाळ्यात मिळाली आहे. आपला ईव्हीएमला विरोध असून बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास चित्र वेगळे दिसेल. आता ईव्हीएमच्या विरोधात अहिंसात्मक आंदोलन आणि चळवळ उभारण्यात येणार आहे. जनतेची चळवळच आता आरएसएसचा पराभव करू शकते. आरएसएसमार्फतच देशाचा कारभार सुरु असून ते देशासाठी धोकादायक आहे. आरएसएस कडे आता पैसा भरपूर आल्याने त्यांना हरविणे आता सोपे नाही.'' त्यामुळे देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी व लोकशाही वाचविण्यासाठी आता अधिकाधिक उमेदवार उभे करून निवडणूक प्रक्रिया कोलमडून टाकणे याच कृतीचा वापर करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माने म्हणाले...
- मोदी आणि फडणवीस सरकार हे ईव्हीएमचे सरकार
- निवडणूक अयोग प्रधानमंत्री कार्यालयाचे बटीक झाले आहे
- अॅड. बाळासाहेब आंबेडकर कॉंग्रेस- राष्ट्रवादी व डाव्यांसोबत आल्यास माझा पक्ष वंचितमध्ये विलीन करेन
- मातोश्रीचे वावडे नसून एकवेळ शिवसेनेबरोबर निवडणुकीची बोलणी करेन : प्रबोधनकार माझे गुरु
- वंचित आघाडीची मदत भाजपाला होणार असेल तर प्राण गेला तरी आपण तेथे जाणार नाही

कॉंग्रेस- राष्ट्रवादीकडे 76 जागांची मागणी
बहुजन वंचित आघाडी, महाराष्ट्र बहूजन आघाडी, इंडियन मुस्लिम लीग, जमियत उलमा हिंद यासह अन्य पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह डाव्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन ते तीन दिवसात जागा वाटप होणार असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडे 76 जागांची मागणी केल्याची माहिती माजी आमदार लक्ष्मण माने यांनी या वेळी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com