प्रकाश आंबेडकरांसोबत कुठलाही स्वाभिमानी मनुष्य राहणार नाही : लक्ष्मण माने

प्रकाश आंबेडकरांसोबत कुठलाही स्वाभिमानी मनुष्य राहणार नाही : लक्ष्मण माने

सातारा : लोकशाहीत संघटक माणसे जोडत असतो. तोडणाऱ्या माणसाला राजकारणात स्थान राहात नाही. प्रकाश आंबेडकर ते स्वत:च्या हाताने करत आहेत. बाबासाहेबांचा नातू म्हणून लोक सद्‌भावनेने व भावनात्मकतेने त्यांच्याकडे जातात. ती सद्‌भावना ते समजून घेत नाहीत. आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांसमवेत ते विश्‍वासाने राहात नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत मीच नव्हे स्वाभिमानी मनुष्य कोणीच राहणार नाही, असा विश्‍वास महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी व्यक्त केला. 

वंचित आघाडीला फूट पडली असून जागा वाटपाच्या मुद्‌द्‌यावरून एमआयएम वंचित आघाडी सोडून गेली आहे. यापूर्वी आघाडीतील नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ सोडून स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे. मुळ वंचित आघाडीतील फुटीबाबत लक्ष्मण माने यांच्याकडून सरकारनामाच्या प्रतिनिधीने जाणून घेतले. 

ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांचा हा स्वभावाचा भाग आहे. लोकशाहीत संघटक माणसे जोडत असतो. माणसे तोडणाऱ्याला आताच्या राजकारणात फारसे स्थान राहात नाही. ते त्यांच्या हाताने हे सर्व करत आहेत. लोक त्यांच्याकडे बाबासाहेबांचा नातू म्हणून सद्‌भावनेने आणि भावनात्मकतेतून जातात. ही भावनिकता ते समजून घेत नाहीत. आलेल्या माणसाची भावना ही केवळ प्रकाश आंबेडकर या माणसासाठी नसते. ती बाबासाहेबांसाठी असते. त्यांच्या पायाला हात लावतो, हा आंबेडकरांचा नातू म्हणून प्रकाश आंबेडकर म्हणून नव्हे. या भावनांची कदर ते करत नाहीत. बरोबरच्या सहकाऱ्यांसमवेत विश्‍वासाने राहात नाहीत. त्यांच्यासोबत मीच नव्हे कोणीच राहणार नाही. स्वाभिमानी मनुष्य कोणीच राहणार नाही. त्यांचे सहकारी त्यांना सोडून जातील. 

मी वंचित आघाडी सोडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्यांसोबत जाणार आहे. ते माझे मित्र पक्ष आहेत. त्यांना आम्ही दहा सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यांनी आमच्या जागांच्या मागणी बाबत अद्यापपर्यंत काहीही कळविले नाही. त्यांनी कोणतीच भुमिका स्पष्ट केली नाही तर आमचा मार्ग आम्हाला मोकळा असेल, असेही लक्ष्मण माने यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com