कॉंग्रेसवाले भोगताहेत पापाची शिक्षा : लक्ष्मण माने

 कॉंग्रेसवाले भोगताहेत पापाची शिक्षा : लक्ष्मण माने

लातूर : गेल्या काही वर्षांत कॉंग्रेसने पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आदी नेत्यांचे विचार सोडले आहेत. कॉंग्रेसने डाव्यांची वाट लावली. त्यातच या पक्षाच्या नेत्यांची अनेक प्रकरणे समोर येत असून, ते पापाची शिक्षा भोगत आहेत, अशी टीका महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी येथे शुक्रवारी (ता.23) पत्रकार परिषदेत केली. मात्र, कॉंग्रेसचा विचार हा राष्ट्रबांधणीचा असल्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबतच आघाडी करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

माने म्हणाले, ""लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाला मदत झाली आहे. त्यामुळे "वंचित'मधून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी नावाचा पक्ष स्थापन केला आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहणार असून, पन्नास जागांची मागणी केली आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील दोन जागांचा समावेश असेल.'' 

""देशाला सध्या हिटलरचा अनुभव घ्यावा लागत आहे. मोदी सरकारमुळे देशाची राज्यघटना धोक्‍यात आली आहे. भाजप सत्तेत असला तरी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघच चालवत आहे. त्यांना आपली राज्यघटना मान्य नाही. अफगाणिस्तानमधील तालिबानसारखे हे "हिंदी तालिबान' आहेत. अशावेळी बहुजन समाजाला वाचवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे भाजपला हरवणे हा आमचा अजेंडा आहे,'' असे ते म्हणाले. 

आंबेडकर हटवादी आहेत... 
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर हे हटवादी आहेत. त्याचा परिणाम आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी पाहिला आहे. आम्ही 48 मतदारसंघात उमेदवार उभे केले. आमच्यासह कॉंग्रेसचेही वाटोळे झाले. आताही ते तसाच हटवादीपणा करीत आहेत असा आरोपही लक्ष्मण माने यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com