laxman mane and alliance | Sarkarnama

दोन्ही कॉंग्रेसशी आघाडी करताना " एमआयएम'शी मैत्री तोडणार नाही - लक्ष्मण माने

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

सातारा : सर्व वंचितांची मोट बांधून भाजप व शिवसेनेला सत्तेतून हटविण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा करण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी आहे. त्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने तीन ते चार वेळा हारलेल्या अशा 12 जागा आघाडीला सोडाव्या लागतील. ही आघाडी करताना मात्र, एमआयएमशी मैत्री आम्ही तोडणार नाही, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सातारा : सर्व वंचितांची मोट बांधून भाजप व शिवसेनेला सत्तेतून हटविण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा करण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी आहे. त्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने तीन ते चार वेळा हारलेल्या अशा 12 जागा आघाडीला सोडाव्या लागतील. ही आघाडी करताना मात्र, एमआयएमशी मैत्री आम्ही तोडणार नाही, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

समाजातील वंचित घटकांना एकत्र करून आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुक लढणार असून सत्ताही स्थापन करणार आहोत, असे भाकित वर्तवून श्री. माने म्हणाले, कॉंग्रेससोबत आमची बैठक झाली. यामध्ये कॉंग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांशी आघाडीबाबत बोलूनच निर्णय घ्यावा लागेल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच एमआयएमशी मैत्रीही सोडावी लागेल, असेही त्यांनी सांगितले आहे. पण आम्ही एमआयएमशी मैत्री सोडणार नाही. ते जातीयवादी आहेत, असे कॉंग्रेसचे नेते मंडळी म्हणत असले तरी जातीयवादी कोण नाही, हे त्यांनी सांगावे. आम्ही आघाडीसाठी 12 जागांची मागणी करत आहोत. या बारा जागा आजपर्यंत दोन्ही कॉंग्रेस तीन ते चार वेळा हारलेल्या आहेत, अशा जागा द्याव्यात. दोन्ही कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीची दारे निवडणुकीचे अर्ज दाखल होईपर्यंत खुली असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पण आमचा निवडणुकीपूरता वापर होणार असेल तर आम्ही कदापी आघाडी करणार नाही. अद्याप राष्ट्रवादीने आम्हाला प्रस्ताव दिलेले नाही. अजित पवार यांनी आम्हाला चर्चेला बोलवावे. भाजपने 22 राज्यातील सत्तेत कुठेही मुस्लिम, ख्रिश्‍चन समाजाला प्रतिनिधीत्व दिलेले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत कधीही जाणार नाही. आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चारही पक्षांनी धनगर, वंजारी, विमुक्त व भटक्‍या समाजासह मराठा समाजालाही फसविले आहे. त्यांनी सगळ्यांना वाटाणे लावले आहेत. महाराष्ट्र क्रांती संघटनेला आम्ही सोबत घेणार आहोत, कारण ते वंचित मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
पवारांचे ऐकायला मी दुधखुळा नाही : लक्ष्मण माने 
वंचित बहुजन आघाडीत तुम्ही शरद पवारांच्या सांगण्यावरूनच गेला आहात काय, या प्रश्‍नावर लक्ष्मण माने थोडे संतप्त झाले. ते म्हणाले, मी काय दुधखुळा नाही. मी लिहिणारा माणूस आहे. माझ्याकडे निर्णय क्षमता आहे. त्यामुळे शरद पवारांनी सांगावे आणि मी ऐकावे, असे होत नाही. गेली 40 वर्षे त्यांचे आणि माझे संबंध आहेत. पण तेच माझे ऐकून निर्णय घेत असतात, असेही स्पष्टीकरण त्यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख