आझमभाईंना विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी लक्ष्मणभाऊ आणि महेशदादांचे प्रयत्न

आझमभाईंना विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी लक्ष्मणभाऊ आणि महेशदादांचे प्रयत्न
पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपमधील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी शहर भाजप पुन्हा सक्रिय झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिला, तर मंगळवारी त्यांना यासंदर्भात भेटणारअसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आज स`सरकारनामा`ला सांगितले.

भाईंचे शहरात वजन असून त्यांचे पुनर्वसन झाले,तर त्याचा फायदा आगामी लोकसभेला लक्ष्मणभाऊ व भाजपला होणार आहे. हे गणित डोक्यात ठेवून विधानपरिषद व महामंडळ नियुक्तीत डावलले गेलेल्या भाईंसाठी भाजपचे नेते कामाला लागले आहेत.

लक्ष्मणभाऊ, महेशदादा लांडगे व त्यांचे समर्थक नगरसेवक व पदाधिकाऱ्यानंतर भाईही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. या त्रिमूर्तीमुळे (भाऊ,दादा,भाई) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्यावर्षी भाजप प्रथमच सत्तेत आला. त्याचे बक्षीस म्हणून शहराला मंत्रिपद देण्याचे आश्वासन मिळालेले आहे. ते अद्याप खरे उतरलेले नाही.

येत्या काही दिवसांत मंत्रीमंडळाच्या शेवटच्या विस्तारात ते वास्तव्यात येईल, अशी आशा शहरवासिय बाळगून आहेत. त्यापूर्वी भाईंचे पुनर्वसन व्हावे, अशी दादा व भाऊंची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरु आहेत. दरम्यान, विधानपरिषदेनंतर महामंडळावरही त्यांची नियुक्ती न झाल्याने भाई समर्थक नाराज झालेले आहेत. त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची भीती असल्याने भाईंना संधी द्यावी, यासाठी शहर भाजपचे प्रयत्न चालले आहेत.

दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर आझमभाईंना संधी द्यावी, यासाठी दोन्ही आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com