भाऊ अप्पांना मदत करणार का? मावळात युतीनंतरही मिलन नाही

युती झाल्याने आणि पार्थ पवार यांच्या रुपाने पवार कुटुंबीयांचा सदस्य मावळातील शर्यतीत आता नसल्याने श्रीरंगअप्पा बारणे यांचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे.
भाऊ अप्पांना मदत करणार का? मावळात युतीनंतरही मिलन नाही

पिंपरी: युती झाल्याने आणि पार्थ पवार यांच्या रुपाने पवार कुटुंबीयांचा सदस्य मावळातील शर्यतीत आता नसल्याने श्रीरंगअप्पा बारणे यांचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे.

दरम्यान, युतीमुळे मावळच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून गत वेळेसारखीच यावेळीही तेथे युती आणि आघाडी अशीच थेट लढत होईल, अशी चिन्हे आहेत.

पार्थ पवार यांचे पिंपरी चिंचवडसह मावळ मतदारसंघात अचानक दौरे वाढल्याने ते लोकसभेचे संभाव्य उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पार्थ पवार निवडणूक लढविणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. मात्र, आता राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे रहस्य वाढले आहे. दुसरीकडे येथून इच्छुक असलेल्यांच्या आशा पुन्हा पानवल्या आहेत. अशीच काहीशी स्थिती शिरूरमध्ये निर्माण झाली आहे. अजित पवार सुद्धा लोकसभा लढविणार नसल्याचे शरद पवार यांनी क्लिअर केल्याने शिरूरमध्ये शिवाजीराव आढळरावदादांविरुद्ध राष्ट्रवादीचा कोण उमेदवार असेल, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सोमवारी युतीची घोषणा आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पार्थ पवार रिंगणात नसणार ही घोषणा म्हणजे बारणे यांच्या दृष्टीने डबल धमाका ठरला. फक्त पिंपरी चिंचवड शहर भाजपचा त्यांच्या मार्गात मोठा अडथळा राहिला आहे. भाजपने मावळवरच दावा केल्याने पेच वाढला आहे. त्यामुळे युतीनंतरही बारणे यांचे कट्टर विरोधक चिंचवडचे भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप बारणेंना खरंच मनापासून मदत करतील का असे चित्र सध्या आहे. परिणामी तशी विचारणा केली जाते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com