laxman jagtap, mahesh landge dream will not be reality | Sarkarnama

भाऊ, दादांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले

उत्तम कुटे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

युतीचे सरकार पुन्हा राज्यात येणार नसल्याचा मोठा तोटा भाजपच्या जोडीने पिंपरी-चिंचवड शहरालाही बसला आहे. कारण यावेळी शहरातील भाजपच्या दोन आमदारांपैकी एकाला मंत्रीपद जवळपास नक्की मिळणार होते. मात्र, आता त्याने पुन्हा हुलकावणी दिल्याने दोन आमदारांचीच नाही, तर शहरवासियांचीही मोठी निराशा झाली आहे. यामुळे शहराला मंत्रीपद मिळण्याची संधी २०१४ प्रमाणे २०१९ च्या टर्मलाही पुन्हा हुकली आहे. परिणामी मंत्रीपदाचा शहराचा बॅकलॉग कायम राहिला आहे.

पिंपरीः युतीचे सरकार पुन्हा राज्यात येणार नसल्याचा मोठा तोटा भाजपच्या जोडीने पिंपरी-चिंचवड शहरालाही बसला आहे. कारण यावेळी शहरातील भाजपच्या दोन आमदारांपैकी एकाला मंत्रीपद जवळपास नक्की मिळणार होते. मात्र, आता त्याने पुन्हा हुलकावणी दिल्याने दोन आमदारांचीच नाही, तर शहरवासियांचीही मोठी निराशा झाली आहे. यामुळे शहराला मंत्रीपद मिळण्याची संधी २०१४ प्रमाणे २०१९ च्या टर्मलाही पुन्हा हुकली आहे. परिणामी मंत्रीपदाचा शहराचा बॅकलॉग कायम राहिला आहे.

गतवेळी मंत्रीमंडळ विस्तारात शहराचा मंत्रीपदाचा बॅकलॉग भरून निघेल, अशी मोठी शक्यता होती. कारण पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आणल्याने शहराला मंत्रीपद देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले होते. मात्र, ते गाजरच निघाले. शहरालगतचे मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यांचा यावेळी गेल्या महिन्यात विधानसभेला पराभव झाला. तर,गत टर्मला मंत्रीपदाच्या शर्यतीतील शहरातील भाजपचे दोन्ही आमदार पुन्हा निवडून आले. त्यातील चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप यांनी,तर हॅटट्रिक केली. भोसरीचे महेशदादा लांडगे  पाऊण लाखाचे दणदणीत लीड घेणारे पक्षाचे राज्यातील सातव्या क्रमाकांचे आमदार ठरले. त्यामुळे गतवेळी हुकलेली संधी या दोघांपैकी एकाला यावेळी मिळण्याची मोठी शक्यता होती. मात्र, शिवसेनेने भाजपला साथ न देण्याचे ठरवल्याने सरकार स्थापन न करण्याचा निर्णय भाजपने रविवारी घेतला.त्यामुळे शहराचे मंत्रीपद पुन्हा हुकले. तसेच मंत्री होण्याचे भाऊ व दादांचे स्वप्नही तूर्त भंगले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख