लक्ष्मण जगताप व महेश लांडगे खडबडून झाले जागे : नगरसेवकांना दिली तंबी

विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगतापांचे मताधिक्य घटले.
लक्ष्मण जगताप व महेश लांडगे खडबडून झाले जागे : नगरसेवकांना दिली तंबी

पिंपरी :शहरातील नागरी समस्या व त्यातही पाणीप्रश्नाने विधानसभेला सत्ताधाऱ्यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी तापविल्याने  शहरातील सत्ताधारी भाजपच्या कारभारी आमदारांना याप्रश्नी उशीरा का होईना आता जाग आली आहे.

हे मुलभूत प्रश्न प्रशासनाकडून सुटत नसल्याने ते घेऊन आपल्याकडे या,असे सांगण्याची पाळी त्यांच्यावर गुरुवारी आली.दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे २०२२ ची आगामी पालिका निवडणुक ही महाशिवआघाडीविरुद्ध भाजपला जड जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तिची तयारी आतापासूनच म्हणजे अडीच वर्षे अगोदरच करण्याचे फर्मान भाजप नगरसेवकांच्या कालच्या या शिकवणीत सोडण्यात आले.

कचरा,पाणी हे नागरी प्रश्न घेऊन मिडियाकडे गेलात वा आंदोलने केलीत तर; बडतर्फ करू,असा इशाराही शहराचे कारभारी असलेल्या भाजपच्या दोन्ही आमदारांनी काल दिला. कारण या प्रश्नांचाच फटका शहरात युतीला विधानसभेला बसला. शहरातील युतीचा एक आमदार कमी झाला. तर,चिंचवडला लीड निम्याने घटले.

पाणी व कचराप्रश्नी भाजपच्याच नगरसेवकांनी आंदोलन करीत एकप्रकारे स्वपक्षालाच घरचा आहेर दिलेला होता. त्यामुळे आता विधानसभा निकालानंतर खडबडून जाग आलेल्या भाजपने शहरातील आपल्या सर्व नगरसेवकांची पालिकेत बैठक घेऊन त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला. लोकांची कामे करा, त्यांच्यापर्यंत जा,त्यांच्या समस्या सोडवा, असे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप (चिंचवड)आणि महेशदादा लांडगे यांनी नगरसेवकांना बजावले.

या बैठकीला उपस्थित असलेले सभागृहनेते एकनाथ पवार यांच्यासह इतर काही नगरसेवकांनीही त्याला दुजोरा दिला. विधानसभा निकालामुळे नगरसेवकांचा क्लास घेण्याचा खरा हेतू असलेल्या या बैठकीला  नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार असे गोंडस नाव त्याला देण्यात आले होते. प्रत्यक्षात बैठकीत नगरसेवकांना खडे बोल सुनावले गेले. त्यातून पाणीप्रश्नाचे चटके भाजपला चांगलेच बसल्याचे दिसून आले आहे. सध्याही शहरात पाणीटंचाई सुरु आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रश्न सोडविण्याची मागणी या बैठकीत माजी महापौर नितीन काळजे यांनी केली.

हा धागा पकडून आता याप्रश्नीच नव्हे, तर इतर कुठल्याही नागरी प्रश्नाबाबत आंदोलन न करता नगरसेवकांनी ते आपल्याकडे घेऊन यावेत,असे दोन्ही आमदारांनी सुनावले.तसेच त्याप्रश्नी मिडियाकडे न जाण्यासही बजावले. गेलात तर कारवाई करू,असे बजावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com