पंढरपूर-मंगळवेढा - विधानसभेच्या तिकीटाच्या शर्यतीत लक्ष्मणराव ढोबळेंचेही नाव

पंढरपूर-मंगळवेढा - विधानसभेच्या तिकीटाच्या शर्यतीत लक्ष्मणराव ढोबळेंचेही नाव

मंगळवेढा :  लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी पाच दिवसाचा अवधी शिल्लक राहिला असताना व या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा तालुक्यांमध्ये जोर धरत असताना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजप व शिवसेना युतीचा उमेदवार कोण याची चर्चा रंगू लागली आहे. त्यात आता नव्याने भाजपात प्रवेश केलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे नाव समर्थकांमधून चर्चेत येऊ लागले आहे.

ढोबळे यांचे समर्थक सध्या त्यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघांमध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मंगळवेढा मतदार संघाचे अस्तित्व संपून पंढरपूर- मंगळवेढा असा नवा मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघाचे पहिले आमदार होण्याचा मान आमदार भारत भालके यांनी  स्वाभिमानी संघटनेतून मिळवला त्यानंतर त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षातून आमदारकी मिळविली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेसच्या प्रचाराची धुरा भारत भालके यांनी एकाकी हाताळली तर भाजपाच्या सत्ता काळात तालुक्यात भाजपाचा गट मजबूत झाला नाही. पण लोकसभेच्या आखाड्यात मात्र सर्वच राजकीय नेते एकत्र आल्यामुळे भाजपा तुल्यबळ झाली.

या निकालाचा परिणाम विधानसभेवर होणार आहे. परंतु, सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजपातील अनेक जण उमेदवारी मिळण्यासाठी दावेदार असून त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे. या इच्छुकांत एकमत न झाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता आहे.आमदार प्रशांत परिचारक यांचा विधानपरिषदेचा अवधी अजून  शिल्लक असल्यामुळे ते विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता कमी असली तरी तालुक्यात लक्ष्मण ढोबळे व  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्या प्रवेशामुळे भाजपला ताकद मिळाली आहे. त्यात पुन्हा आमदार परिचारक गट या सर्व गटाची तुलना केल्यास भाजपाची ताकद वाढली आहे. ढोबळे यांच्या भाजप प्रवेशापासून ते लोकसभेचे दावेदार म्हणून चर्चेत होत.  पण त्याचे पुर्नवसन विधानसभेत होऊ शकते. ते मोहोळ की माळशिरस की पंढरपूरच्या खुल्या जागेवर याची उत्सुकता आहे.

अशा परिस्थितीत युतीच्या बैठकीमध्ये जागेच्या निश्चीतीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य गटबाजीत या सर्वांना रामबाण उपाय म्हणून ढोबळेचे नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही  सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत तालुक्‍यांमध्ये कोणत्याही दानशूर संस्थेने मदतीचा हात दुष्काळी जनतेला दिला नाही. आज स्वतःच्या वाढदिवसाला फाटा देत दुष्काळी जनावरांना पशु खाद्य वाटपाचा निर्णय घेतला. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. भाजपाच्या सर्वच नेत्यांची मोट वाढदिवसानिमित्त सोलापुरातील कार्यक्रमातून बांधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या चर्चेतून त्यांच्या नावाचा सुर निघण्याची चर्चा तालुक्यातील ढोबळे समर्थकातून होत आहे. पण विधानसभा की विधानपरिषद याचा निर्णय मात्र पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com