लक्ष्मण ढोबळे `ती चूक` दुरूस्त करणार....

लक्ष्मण ढोबळे `ती चूक` दुरूस्त करणार....

मंगळवेढा :मंगळवेढा आणि मोहोळ या दोन मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याकडे 2014 मध्ये होती. त्यांनी आपल्याकडे निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या एक दिवस जरी लक्ष दिले असते तरी आजचा हा मेळावा घेण्याची वेळ आली नसती, अशी खंत व्यक्त करत आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रारब्धातील जे लिहले चुकत नाही, अशी भूमिका घेतली.

कचरेवाडी येथील स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. गेल्या निवडणुकीत परिचारक यांचा भारत भालके यांनी पराभव गेला. त्यानंतर परिचारक हे विधान परिषदेवर निवडून गेले. यंदा त्यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून त्यांनी मेळावा घेतला. उमेदवार कोण असेल हे परिचारक यांनी जाहीर केले नसले तरी त्यांचा गट निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

बंद पडणारी साखर कारखानदारी सुरू करणारे परिचारक कुटुंबीय असून कारखानदारी बंद पाडणारे समोर उभे राहण्याच्या राहणारे अशा परिस्थितीत परिचारक कुटुंबातील कोणीही विधानसभा लढवावी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू मागील चूक दुरुस्त करू, असे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी य़ा वेळी जाहीर केले. 

विधानसभेच्या तोंडावर  पंढरपूर व मंगळवेढ्यातील राजकारण निर्णायक वळणावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक  मंगळवेढ्यातील रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा  यांनी यांनी आपल्या गटाचे समर्थन परिचारक गटाला दिल्यामुळे आमदार भारत भालके गटाला धक्का बसला आहे

यावेळी बोलताना  प्रशांत परिचारक म्हणाले की राज्यात शेतकरी संपावर गेला ,मराठा आरक्षणाचा प्रश्न, धनगर आरक्षणाचा प्रश्न,बाबत दुसरा कोणी मुख्यमंत्री असता तर तो वाऱ्यावर गेला असता. परंतु या मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न कितीही प्रश्न येऊ द्या  मी त्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्यामुळे त्या प्रश्नाची सोडवणूक खंबीरपणे केली.

तालुक्यात दुष्काळी गावांचा पालकमंत्री समवेत दौरा केल्यामुळे तोकड्या अनुदानामध्ये छावणी चालवणे परवडत नसल्यामुळे अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी केली. त्याच वेळी पालकमंत्र्यांनी महसूलमंत्र्याच्या व मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा प्रश्न घालून यामध्ये अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात पक्षप्रवेशाबाबत मेगा भरती बाबत सध्या चेष्टा सुरू आहे परंतु मुख्यमंत्र्यांच्या व महसूलमंत्र्यांच्या पाठीमागे पक्षप्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. जे गेल्या आषाढी एकादशीला दगड मारू म्हणणारे यंदाच्या आषाढीला चहा प्यायला घरी या, असे म्हणू लागले, असेही परिचारक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com