जेंव्हा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे प्रचार फेरीत नाचतात (व्हिडिओ)

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील प्रचार इतका शिगेला पोहचला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचार फेरीत हालगीच्या तालावर डान्स केला आहे. मतदारसंघात याचीच चर्चा सुरू आहे.
Laxman Dhobale Dance in BJP Rally at Mangalwedha
Laxman Dhobale Dance in BJP Rally at Mangalwedha

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील प्रचार इतका शिगेला पोहचला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचार फेरीत हालगीच्या तालावर डान्स केला आहे. मतदारसंघात याचीच चर्चा सुरू आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके विरुद्ध भाजपचे सुधाकरपंत परिचारक यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. काल पंढरपूरात सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी एक प्रचार फेरी सुरू होती. यात भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ सुध्दा सहभागी होत्या.यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी हलगीच्या तालावर चक्क डान्स केला. 

प्रचार फेरीत सहभागी लोकासोबत ते डान्स करत असल्याचा व्हिडीयो सगळी कडे व्हायरल झाला आहे. या मुळे मंगळवेढ्यातून आमदार राहिलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केलेल्या डान्सची चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com