जयसिद्धेश्वर महास्वामींची खासदारकी वाचेल!

"मी शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने आदेश दिला तर मी लढेन पण दुसऱ्याला उमेदवारी दिली तर त्याला हार घालायला जाणारा पहिला मी असेन "असे ढोबळे म्हणाले.
solapur loksabah
solapur loksabah

पुणे : "सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी उच्च न्यायालयात योग्य दाखला दिला तर त्यांची खासदारकी वाचेल," असा विश्वास माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.

आज सकाळी ढोबळे यांनी "स्वामी जयसिद्धेश्वर निवड रद्द झाली आणि पार्टीने आदेश दिला तर आपण मैदानात उतरू आणि जिंकू."अशी भूमिका मांडल्याचे वृत्त आले होते.  त्यांच्या  भूमिकेचे अनेक अर्थ लावण्यात येत होते .अजून स्वामी जयसिद्धेश्वर यांच्या लोकसभा सदस्यत्वाचा रद्द बाबतचा निर्णय झालेला नाही,. तरीही ढोबळे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आश्चर्यही व्यक्त  करण्यात येत होते.

काही वर्षांपूर्वी शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेल्या ढोबळे यांची 2014 पासून राष्ट्रवादीने उपेक्षा केली. त्यांना मोहोळ मधून उमेदवारीही नाकारली गेली. मग त्यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवली मात्र त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये गेल्यावर त्यांनी सोलापूर, माढा या मतदारसंघात प्रचारसभाही घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँगेसवर जोरदार टीका केली होती.  

भाजपमध्ये गेल्यावर ढोबळे यांना पक्षाकडून जबाबदारी मिळेल अशी शक्यता त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली होती मात्र अजून त्यांना ठोस काही जबाबदारी मिळालेली नाही. आज जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर ढोबळे यांना पत्रकारांनी आपण निवडणूक लढवणार काय ? असे विचारल्यावर त्यांनी "पार्टीने आदेश दिला तर आपण मैदानात उतरू आणि जिंकू."असे म्हटले मात्र लगेच त्यांनी ,"खासदार स्वामी सिद्धेश्वर यांनी सुप्रीम कोर्टात योग्य दाखला दिला तर त्यांची खासदारकी वाचेल"असेही विधान केले.

"मी शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने आदेश दिला तर मी लढेन पण दुसऱ्याला उमेदवारी दिली तर त्याला हार घालायला जाणारा पहिला मी असेन "असे ढोबळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com