Latur Z.P. President and vice president from Nilanga | Sarkarnama

लातूर जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांची हुकूमत ; अध्यक्ष, उपाध्यक्ष दोघेही निलंगा तालुक्‍याचेच 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 21 मार्च 2017

लातूर:  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मिलिंद लातुरे व उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरूके यांची मंगळवारी (ता. 21) बिनविरोध निवड झाली. भाजपने जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर प्रथमच एकहाती सत्ता मिळविली आहे. मात्र, पालकमंत्री संभाजी पाटील यांनी अध्यक्षपद आपल्याच तालुक्‍याकडे ठेवून स्वतःची हुकूमत निर्माण केली आहे. 

लातूर:  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मिलिंद लातुरे व उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरूके यांची मंगळवारी (ता. 21) बिनविरोध निवड झाली. भाजपने जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर प्रथमच एकहाती सत्ता मिळविली आहे. मात्र, पालकमंत्री संभाजी पाटील यांनी अध्यक्षपद आपल्याच तालुक्‍याकडे ठेवून स्वतःची हुकूमत निर्माण केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला 58 पैकी 36 जागा मिळाल्या. एका अपक्ष सदस्याने भाजपत प्रवेश केल्याने भाजपची सदस्य संख्या 37 झाली. सभागृहात कॉंग्रेसचे 15, राष्ट्रवादीचे पाच व शिवसनेचा एक सदस्य आहे. त्यामुळे विरोधातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज न भरल्याने भाजपचे अध्ययक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध निवडले गेले.

नूतन अध्यक्ष लातुरे हे कर्नाटकाच्या सीमेवरील निलंगा तालुक्‍यातील कासार बालकुंदा गटातून निवडून आले आहेत. त्यांना अध्यक्षपदी बसवून पालकमंत्री संभाजी पाटील यांनी अध्यक्षपद स्वतःच्या निलंगा तालुक्‍याकडे ठेवले तर, उपाध्यक्ष तिरूके हेसुद्धा निलंगा मतदारसंघातील वलांडी (ता. देवणी) येथून निवडून आले आहेत. 

भाजपच्या गटनेतेपदी आमदार विनायकराव पाटील यांच्या अहमदपूर तालुक्‍यातील हडोळतीचे प्रकाश देशमुख यांच्याकडे गेले. पालकमंत्री निलंगेकर, आमदार विनायकराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव, रमेश कराड आणि जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्या कोअर कमिटीने सत्ता वाटपाचे निर्णय घेतल्याचा दावा पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मात्र, महत्वाची दोन्ही पदे निलंग्याशी संबंधित असल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेवर पालकमंत्र्यांचाच ठसा उमटला आहे. 

महापालिकेच्या अनुषंगाने निर्णय 

जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करताना भाजपने महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठवल्याचे दिसून येते. शहर व जिल्ह्यातील जातीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न करत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद लातुरे यांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीतून महापालिकेवरील सत्तेचा पाया मजबुत करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख