रंग उधळत जिल्हाधिकारी श्रीकांत, इटनकर यांचा भन्नाट डान्स 

नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि लातूरचे जी. श्रीकांत यांनी एकत्रितपणे रंग उधळले.
latur, nanded collectors cement strong friendship with colours
latur, nanded collectors cement strong friendship with colours

लातूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पहिल्यांदाच रंगपंचमीनिमित्त रंगाची मुक्त उधळण दिसून आली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रंगपंचमी निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना निमंत्रित केले होते. कामाचा ताणतणाव बाजूला सारत सर्वांणीच रंगाची मुक्त उधळण केली. 

नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इटनकर आणि लातूरचे जी. श्रीकांत यांनी एकत्रितपणे साजरी केलेली रंगपंचमी हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. रंगांची मुक्त उधळण आणि खास होळी गीतांवर या दोन मित्रांनी केलेला भन्नाट डान्स सगळ्यांच्या लक्षात राहिला.

जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्याकडून विविध सण व उत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यात सहभागी करून घेतले जाते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते आपल्याच कुटुंबांचे सदस्य असल्याची जाणीव करून देत त्यांच्यातही तशी भावना वाढीस लावण्याचा श्रीकांत यांचा प्रयत्न असतो. कार्यालयात पदानुसार वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा असलेला शिष्टाचार कार्यक्रमाच्या ठिकाणी अजिबात पाळला जात नाही.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत रंगपंचमी साजरी करण्याचा आनंदच वेगळा असतो, असा अनुभव शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत अधिाकरी व कर्मचाऱ्यांनी घेतला. निवासस्थानातील लॉनवर रंगाची मुक्त उधळण करत विविध गाण्यांच्या तालावर सर्वांनी नृत्य केले. 

अधिकारी व कर्मचाऱ्यांना यानिमित्ताने पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी रंगपंचमी साजरी करण्याचा आनंद मिळाला. सण व उत्सव हे आनंद देण्यासाठी असतात. सर्वांनीच तो आनंद मनापासून घेतला पाहिजे. रंगपंचमीनिमित्त या आनंदाची अनुभूती सर्वांना देता आली, याचा मला मनस्वी आनंद वाटत असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.

रंगपंचमीचा दुहेरी आनंद
नांदेड जिल्ह्यात होळीनंतरच्या धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी अर्थात धुळवड साजरी केली जाते. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना नांदेडनंतर शुक्रवारी लातूरच्या रंगपंचमीचा दुहेरी आनंद लुटला. 

जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्यासोबत दोन वर्ष सावलीसारखे सोबत वावरलेले डॉ. इटनकर यांनी रंगपंचमीनिमित्त श्रीकांत यांच्यासोबत मनमुराद रंगांची उधळण केली. रंग बरसे, भिगे चुनरवाली सारख्या प्रसिध्द गाण्यांवरही या दोघांनी लयबध्द ठेका धरत उपस्थितांना त्यांच्यातील मैत्रीच्या मजबूत धाग्याचा परिचय करून दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com