लातूर लोकसभा मतदारसंघ : भाजपची यंत्रणा सक्रीय, काँग्रेसमध्ये मात्र मरगळ

लातूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाने आपली यंत्रणा सक्रीय केली आहे. तर दुसरीकडे बालेकिल्ला असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र मरगळ दिसून येत आहे. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तर अद्याप आपल्याला निरोपच आला नाही असे सांगताना दिसत आहेत. कार्यकर्त्यातील मरगळ नेते कशी काढणार याकडे आता लक्ष लागले आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघ : भाजपची यंत्रणा सक्रीय, काँग्रेसमध्ये मात्र मरगळ

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाने आपली यंत्रणा सक्रीय केली आहे. तर दुसरीकडे बालेकिल्ला असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र मरगळ दिसून येत आहे. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तर अद्याप आपल्याला निरोपच आला नाही असे सांगताना दिसत आहेत. कार्यकर्त्यातील मरगळ नेते कशी काढणार याकडे आता लक्ष लागले आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्या वेळेस कमळ फुलवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची यंत्रणा सज्ज झाली आहे. पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचा पत्ता कट केला. सुधाकर शृंगारे यांच्या रुपाने आपल्या मनासारखा उमेदवार दिल्याने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उमेदवारी जाहिर झाल्याच्या दुसऱया दिवसापासूनच यंत्रणा कामाला लावली आहे. जिल्ह्यात निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा राबत आहे.  त्यामुळे त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या नेत्यांना बोलावून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची जिल्ह्याची बैठक येथे घेतली.  दिवसभर ही बैठक चालली. त्यानंतर निलंगेकर यांनी लातूर शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची लातूरमध्ये बैठक घेतली. 

अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची अहमदपूरमध्ये, निलंगा विधानसभा मतदारसंघाची निलंग्यात, उदगीर विधानसभा मतदारसंघाची उदगीरमध्ये, लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाची लोह्यात अशा विधानसभानिहाय बैठका घेवून यंत्रणाला कामाला लावली आहे. त्यांनी दररोज आढावाही घेणे सुरु केले आहे. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्नही त्यांनी सुरु केले आहेत.

लातूर हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येथे पक्षाचे नेते भरपूर असल्याने उमेदवार ठरवण्यासाठी बराच वेळ गेला आहे. शेवटच्या टप्प्यात मच्छिंद्र कामंत यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यात उत्साह
दिसला नाही. उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ओळखही नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर उदगीर वगळता कोठेही जल्लोष झाला नाही.

उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण पक्षाची एकही बैठक झाली नाही. पक्षाच्या पदाधिकाऱयांना, कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे निरोपही नसल्याचे हे कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत. सध्या काँग्रेसच्या प्रचाराची यंत्रणा मरगळलेल्या अवस्थेत आहे. ही मरगळ झटकून त्यांना कामाला लावण्याचे काम पहिल्यांदा काँग्रेसच्या नेतृत्वाला विशेषतः माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांना करावे लागणार आहे.  देशमुख हे कार्यकर्त्यातील मरगळ झटकून कशा पद्धतीने कामाला लावतात याकडे आता लक्ष लागले आहे. पण सध्या तरी प्रचार यंत्रणा कामाला लावण्यात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com