Latur Gurdian Minister Amit Deshmukh Warns Strict Action Against Lock Down Violators | Sarkarnama

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले....लाॅकडाऊ मोडणाऱ्यावर कठोर कारवाईशिवाय पर्याय नाही!

सुशांत सांगवे
गुरुवार, 16 एप्रिल 2020

लातूर जिल्हा कोरोनामुक्त ठेवायचे आहे. जेथे 'लॉकडाऊन'च्या नियमांचे पालन केले जात नाही, तेथे कठोरपणे कारवाई करण्यापलीकडे अन्य पर्याय नाही, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिला

लातूर : लातूर जिल्हा कोरोनामुक्त ठेवायचे आहे. जेथे 'लॉकडाऊन'च्या नियमांचे पालन केले जात नाही, तेथे कठोरपणे कारवाई करण्यापलीकडे अन्य पर्याय नाही, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिला.

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगितले जात आहे. पण अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडणारे नागरिक अजूनही आढळून येत आहे. सोशल डिस्टन्स, मास्क बांधणे या नियमांकडेही डोळेझाक केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर, देशमुख यांनी प्रथमच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

आरोग्य सेवेवरील ताण कमी करा

देशमुख म्हणाले, ''कोविड -19 विरुद्धचा लढा आपणाला जिंकावयाचा असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. अतिशय गरज असल्यास कुटुंबातील केवळ एकाच सदस्याने बाहेर पडावे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य सेवेवरील ताण कमी करावा. लातूर जिल्हा कोविड-19 मुक्त राखण्याचे श्रेय लातुरकर नागरिकांना आहे. जिल्ह्याचे हे स्वरूप आपणाला असेच ठेवावयाचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत कोविड -19 चा प्रादुर्भाव जिल्ह्यात होणार नाही यासाठी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी अधिक काटेकोरपणे काम करावे. यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही,''

''नागरिकांनी कुठेही अनावश्यक गर्दी करू नये, सर्वत्र सामाजिक अंतर पाळावे. या कालावधीत दवाखाने, औषधाची दुकाने, किराणा दुकाने, रास्त भाव दुकाने या व अन्य अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याने या ठिकाणीही सामाजिक अंतर काटेकोरपणे राखले जावे याची दक्षता घ्यावी. घरीच राहाल तर सुखी राहाल आणि तसे झाले तरच कोविड विरुद्ध सुरू असलेला हा लढा जिंकणे साध्य होणार आहे. या लढ्यात जनतेने साथ द्यावी,'' असे आवाहनही देशमुख यांनी केले.

हे देखिल वाचा -  पांडुरंग कृपेने मदत घडते आहे म्हणत,संजय जाधव यांच्याकडून अन्नधान्याचे वाटप 

परभणी - परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी परभणी व आपल्या मतदारसंघात येत असलेल्या जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये साडेसहा हजार धान्य किटचे वाटप करत दिलासा दिला आहे.  लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्य व गोरगरीबांच्या जीवनावर प्रचंड प्रमाणात दिसून आला आहे. विशेष म्हणजे या धान्य किट वाटपाचे फोटो किंवा प्रसिध्दी करायची नाही असा पावित्रा घेत जाधव यांच्यावतीने जिल्ह्यातील गोरगरिबांना मदत करण्यासाठी हजारो हात समोर येत आहेत...

सविस्तर बातमी येथे वाचा 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख