लातूरमध्ये नगरसेवकांना आमदारकीची स्वप्नं; भाजपतर्फे मुलाखती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता. 6) इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी इच्छुकांच्या भाऊगर्दी दिसून आली. सहा मतदारसंघासाठी 111 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. लातूर शहर मतदारसंघासाठी तर अनेक नगरसेवकांना आमदारकीचे स्वप्न पडताना दिसून आले. यातूनच अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत.
BJP Flags
BJP Flags

लातूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता. 6) इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी इच्छुकांच्या भाऊगर्दी दिसून आली. सहा मतदारसंघासाठी 111 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. लातूर शहर मतदारसंघासाठी तर अनेक नगरसेवकांना आमदारकीचे स्वप्न पडताना दिसून आले. यातूनच अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत.

पक्ष निरिक्षक म्हणून पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी मुलाखती घेतल्या. इच्छकांसोबत कार्यकर्ते आल्याने गर्दी झाली होती. औसा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, पालकमंत्री यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, किरण उटगे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव, सुभाष जाधव, काकासाहेब मोरे, संतोष मुक्ता, सुनील उटगे अशा अऩेकांनी मुलाखती दिल्या आहेत. 

लातूर ग्रामिण मतदारसंघातून रमेश कराड, डॉ. अभय कदम, बाजार समितीचे संचालक विक्रम शिंदे, डॉ. दत्ता बावणे, हनुमंत नागटिळक, ओमप्रकाश गोडभरले, प्रकाश पाटील वांजरखेडकर आदींनी मुलाखती दिल्या. निलंगा मतदरासंघात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हेच उमेदवार असल्याने येथे कोणी इच्छूक नव्हते. उदगीर मतदारसंघात विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह पंडीत सूर्यवंशी, अश्वजित गायकवाड, गणेश गायकवाड, बालाजी गवारे आदींनी मुलाखती दिल्या आहेत. अहमदपूर मतदारसंघातून विद्यमान आमदार विनायक पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, दिलीप देशमुख, अशोक केंद्रे, भारत चामे आदींनी मुलाखती दिल्या.

जिल्हाध्यक्ष, महापौरही इच्छूक
विधानसभेच्या जिल्ह्यातील सहा मतदारसंघासाठी 111 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात सर्वाधिक उदगीरमध्ये 29, लातूर ग्रामीण 27, औसा आठ, निलंगा एक, अहमदपूर 22 तर लातूर शहरसाठी 24 जणांचा समावेश होता. लातूर शहरसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहराध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्यासह महापौर सुरेश पवार, माजी महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर देविदास काळे, भाजपचा सभागृह नेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, नगरसेवक गुरुनाथ मगे, नगरसेवक दीपा गीते, नगरसेवक कोमल वायचळकर, नगरसेवक जान्हवी सूर्यवंशी, सुधीर धुतेकर, प्रेरणा होनराव, डॉ. मन्मथ भातांब्रे, बाबु खंदाडे आदींचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com