latur and maratha morcha | Sarkarnama

लातुरात उद्या ठरणार मराठा आंदोलनाची पुढची दिशा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

लातूर : मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाची पुढची दिशा लातूरात ठरवली जाणार आहे. त्यासाठी उद्या महत्वपूर्ण बैठक मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतील निर्णयांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी राज्याच्या वेगवेगळ्‌या भागात वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू केले आहे. " महाराष्ट्र बंद ' ही पुकारण्यात आला होता. अनेक ठिकाणी या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचेही दिसले आहे. तरीही आंदोलनाची धग कायम आहे.

लातूर : मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाची पुढची दिशा लातूरात ठरवली जाणार आहे. त्यासाठी उद्या महत्वपूर्ण बैठक मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतील निर्णयांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी राज्याच्या वेगवेगळ्‌या भागात वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू केले आहे. " महाराष्ट्र बंद ' ही पुकारण्यात आला होता. अनेक ठिकाणी या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचेही दिसले आहे. तरीही आंदोलनाची धग कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर, सकल मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. लातूरातील बार्शी रस्त्यावरील राहीचंद्र मंगल कार्यालयात उद्या (रविवारी) सकाळी अकरा वाजता होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील समन्वयक आणि मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. 

गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे झोपी गेलेल्या सरकारला जाग आहे. आमचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचला आहे. पण ते काही ठोस निर्णय घेतील, यावर आम्हाला भरोसा नाही. त्यामुळे ही बैठक होत आहे. सध्या सुरू असलेले आंदोलन, शैक्षणिक सवलतींकडे सरकारचे दुर्लक्ष, मराठा मुलांच्या वसतिगृहाबद्दल सरकारने घेतलेली भूमिका यासह अन्य मागण्यांबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ऑगस्ट रोजी पुकारण्यात येणाऱ्या बंदबाबतही चर्चा होईल. त्यानंतर आंदोलनाचा पुढचा ठोस निर्णय जाहीर केला जाईल, असे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख