latur | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

लातूरचा पाणी प्रश्‍न सोडवण्याची धमक राष्ट्रवादीतच- धनंजय मुंडे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

लातूर : कॉंग्रेसने लातूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे तडफडत ठेवले, तर सत्ताधारी भाजपने रेल्वेने पाणी आणल्याच्या नुसत्या बढाया मारत पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याची आपली इच्छाशक्तीच नाही हे दाखवून दिले. पण उजनीचे पाणी लातूरला आणून येथील जनतेची तहान भागवण्याची खरी धमक राष्ट्रवादीतच आहे असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी लातूरच्या जाहीर सभेत केला आहे. 

उजनीचे पाणी लातूरला मिळाले असते तर इथला पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटला असता. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी येथील जनतेला झुलवत ठेवल्याचा आरोप करतानाच उस्मानाबादचे नेते उजनीचे पाणी मिळवू शकतात, मग लातूरचे का नाही? इच्छाशक्तीचा अभाव असलेल्या कॉंग्रेसच्या ताब्यात पुन्हा महापालिकेचा कारभार देणार का? असा सवाल देखील मुंडे यांनी उपस्थितांना केला. राज्यात भाजपचे सरकार असले तरी विधान परिषदेत आमचे बहुमत आहे. त्यामुळे सरकारला कोणताही निर्णय घेताना आम्हाला विचारात घ्यावे लागते. विरोधी 
पक्षनेता म्हणून मी तुम्हाला उजनीचे पाणी लातूरला आणण्याचा शब्द देतो अशी ग्वाही देखील मुंडे यांनी यावेळी दिली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख